Discover

मस्त ट्रीप प्लॅन करा आणि जा आंबोलीला! पावसाळ्यात घ्या आकर्षक धबधब्यांचा आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव

आपल्यापैकी बरेच जण उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यात ट्रीप प्लॅन करतात. यामध्ये बरेच जण अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळांची निवड करतात. महाराष्ट्र मध्ये जर आपण निसर्गरम्य ठिकाणांचा विचार केला तर यामध्ये अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशा निसर्ग सौंदर्यांनी वेढलेल्या अनेक हिल स्टेशन सारख्या ठिकाणी ट्रीप प्लॅन केली तर या ठिकाणी आपल्याला अद्भुत अशा निसर्ग सौंदर्याने नटलेले धबधब्यांचा मनमुराद आनंद लुटता येतो.

तसेच उन्हाळ्यामध्ये देखील आपण अशा एखाद्या हिल स्टेशनला भेट देऊ शकतो व थंडगार वातावरणाचा अनुभव घेऊ शकतो. अशाच पद्धतीने तुमचा देखील कुटुंबासोबत कुठे बाहेर फिरण्याचा प्लॅन असेल तर महाराष्ट्रातील आंबोली हे ठिकाण त्यासाठी खूप योग्य राहील. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण आंबोली या हिल स्टेशनचे महत्त्व, त्या ठिकाणाचे धबधबे, नेमके कधी जायचे आणि कसे जायचे याबाबतीतली महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

आंबोली आहे निसर्गसौंदर्यांनी नटलेले हिल स्टेशन

आंबोली हे दक्षिण महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर असे हिल स्टेशन असून त्या ठिकाणी आंबोली धबधबा आहे. पावसाळ्यामध्ये हा धबधबा खळाळून असा वाहतो. त्यामुळे या ठिकाणी पावसाच्या दिवसात खूप सुंदर व अद्भुत अशा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो. आंबोली हे कोकण विभागात येते व हे सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून देखील ओळखले जाते.

एक उत्तम हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेले आंबोली अनेक छोट्या-मोठ्या आकर्षक धबधब्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. या ठिकाणी प्रसिद्ध असा आंबोली धबधबा हा सर्वात मोठा आहे. एवढेच नाही तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तसेच प्राणी आणि अनेक प्रकारचे इको हॉटस्पॉट देखील या ठिकाणी असल्यामुळे आंबोलीची ही खास ओळख आहे. या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा या धबधब्याजवळ तुम्हाला अद्भुत असा निसर्गरम्य हिरवाईचा आनंद लुटता येऊ शकतो.

आंबोली धबधबा आंबोलीचे खास वैशिष्ट्ये

आंबोली धबधबा हा हिल स्टेशन पासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी खवय्या प्रेमींसाठी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील पाहायला मिळतात. अस्सल महाराष्ट्रीयन उसळ पोहे, वडापाव तसेच व्हेज, नॉनव्हेज आणि सीफूडचा देखील तुम्ही आस्वाद घेऊ शकतात. यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे हे स्टॉल्स तुम्हाला फक्त पावसाळ्यात उपलब्ध होतात.

आंबोलीला जायचा योग्य कालावधी

तुम्हाला जर आंबोलीला जायचे असेल व त्या ठिकाणी असलेल्या आंबोली धबधब्याचा सुंदर अशा दृश्यांचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्यासाठी उत्तम काळ म्हणजे जुलै ते ऑगस्ट आहे. कारण या कालावधीमध्ये या ठिकाणी पाण्याची पातळी देखील वाढलेली असते व हिरवळीची चादर देखील उत्तम प्रकारे पसरलेली असते. त्यामुळे पाहणाऱ्याला मनसोक्त आनंद लुटता येतो. या ठिकाणी असलेला अरुंद रस्ता आणि पडणारे दाट धुके इत्यादीमुळे काळजी घेणे देखील गरजेचे असते.

आंबोलीच्या आजूबाजूला असलेली पर्यटन स्थळे

आंबोली या पर्यटन स्थळाच्या आजूबाजूला देखील अनेक निसर्गरम्य अशी पर्यटन स्थळे असून या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकतात. आंबोलीच्या आजूबाजूला शिरगावकर पॉईंट, हिरण्यकेश्वर मंदिर, कोलशेत पॉईंट आणि नांगरतास धबधबा देखील आहे.

आंबोलीला कसे जाता येईल?

तुम्हाला जर आंबोली या हिल स्टेशनला भेट द्यायचे असेल तर तुम्ही आंबोलीला जवळच्या असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे सावंतवाडी रेल्वे स्टेशन होय. सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे अंतर आंबोली वरून 39 किलोमीटर आहे. तसेच तुम्हाला जर विमानाने प्रवास करायचा असेल तर सर्वात जवळचे एअरपोर्ट सिंधुदुर्ग आहे. हे एअरपोर्ट आंबोली पासून 71 किलोमीटर आहे. सिंधुदुर्ग वरून बस किंवा टॅक्सीच्या माध्यमातून आंबोलीला जाता येते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Amboli

Recent Posts