Ahmednagar News : भारतात लोकशाहीचा महाकुंभ आता खऱ्या अर्थाने सजला आहे. 18 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचा बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा जाहीर केल्यानंतर सर्वत्र राजकीय हालचाली तेच झाल्या आहेत.
राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची चाचपणी करत त्यांची नावे जाहीर करण्यात व्यस्त आहेत. ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तसेच ज्यांना उमेदवारी जाहीर होणार अशी आशा आहे ते सारे नेते आता प्रचाराला सुद्धा लागले आहेत.
राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू केली आहे.त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहेत.
दरम्यान आज मराठा समाजाची अहमदनगर मध्ये एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याऐवजी मराठा समाजाचा उमेदवार या निवडणुकीत देण्यात यावा, असा ठराव सर्वांनुमते मंजूर झाला आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
आरक्षणाच्या मागणीबाबत निर्णय न झाल्याने समाजाची राज्य सरकारवर मोठी नाराजी पाहायला मिळतं आहे.
यातच देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहिता लागली, परिणामी याचा निर्णय आणखी लांबला.यामुळे मराठा समाजाने आता लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानुसार आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाज लोकसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार देणार आहे.
त्यामुळे 2024 मधील महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आणखी देखणी आणि चांगलीच रंगतदार होणार आहे. विशेष म्हणजे उमेदवारांबाबतचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सोपवला जाणार आहे.
उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक आहेत त्यामुळे सर्व बाजूने विचार करून अंतिम उमेदवारांचा अहवाल 30 मार्चला मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सोपवला जाणार अशी बातमी समोर आली आहे. त्यानंतर मग उमेदवारी बाबत घोषणा होणार आहे.