विधानसभा निवडणूक

याचिका मागे घे नाहीतर ईडी मागे लावेन, ‘त्या’ सत्ताधारी आमदाराच्या धमकीने राजकीय वर्तुळात खळबळ

Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुका सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल आणि आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता आहे. अशातच मात्र अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे.

महायुती मध्ये समाविष्ट असलेल्या अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार आशुतोष काळे हे वादात सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार आशुतोष काळे यांच्यावर साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांना सुप्रिम कोर्टातील याचिका मागे घ्यावी यासाठी दबाव आणल्याचा आरोप लगावण्यात आला आहे.

यामुळे सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. साईबाबा संस्थानच्या माजी विश्वस्तांनी जर याचिका मागे घेतली नाही तर इडी मागे लावू, संपवून टाकू अशी धमकी आमदार आशुतोष काळे यांनी दिली असल्याचा आरोप केला आहे.

आशुतोष काळे यांनी फोनवर ही धमकी दिल्याचे या माजी विश्वस्तांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे याबाबत आमदार आशुतोष काळे यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता त्यांनी आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने खोटे आरोप केले जात असल्याचे यावेळी म्हटले आहे. आमदार काळे यांनी आपली बदनामी करण्यासाठी असे तथ्यहीन आरोप आपल्यावर होत असल्याचे म्हणत यावर स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान आता आपण हे प्रकरण नेमके काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया.

काय आहे हे प्रकरण

हे प्रकरण आहे वर्ष 2021 मधील. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारने साईमंदिर विश्वस्त आणि अध्यक्षांची निवड केली होती. परंतु, या निवडीस हायकोर्टाने स्थगिती दिली होती.

यामुळे हायकोर्टाच्या या स्थगिती नंतर तत्कालिन संस्थांनचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह विश्वस्तांनी सुप्रिम कोर्टात तीन याचिका दाखल करत याला आव्हान देण्याचे काम केले. दरम्यान, सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या या याचिकेवर आता लवकरच निकाल लागणार असे चित्र तयार होत आहे. पण, या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच आमदार काळे यांच्यावर काही गंभीर आरोप केले जात आहेत.

आता अजित पवारांसोबत सत्तेत सामील झाल्याने काळे यांनी आता ही याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणला असल्याचा आरोप माजी विश्वस्त सुहास आहेर यांनी यावेळी केला आहे.

माजी अध्यक्ष आशुतोष काळे यांनी विश्वस्त सुहास आहेर, सचिन गुजर, अविनाश दंडवते यांना फोन करून याचिका मागे घेण्यासाठी दबाव टाकला व धमकी दिल्याचा आरोप झाला आहे.

यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यावेळी काळे यांनी जर याचिका मागे घेतली नाही तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल, तुमचे राजकीय भवितव्य धोक्यात आणले जाईल, तुमच्या मागे हात धुऊन लागू अशी धमकी दिल्याचे या विश्वस्तांचे म्हणणे आहे.

यावरून सत्ताधाऱ्यांकडून खरच ईडीचा दुरुपयोग केला जात आहे का? असा देखील सवाल आता उपस्थित होत आहे. तथापि या आरोपांवर आमदार आशुतोष काळे यांनी इन्कार केला आहे. आपण सत्तेत असल्यानेच आपल्यावर असे आरोप होत आहेत असे आशुतोष काळे यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एकंदरीत आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच सत्ताधारी महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजितदादा यांच्या गटातील आमदार आशुतोष काळे वादात सापडले आहेत.

यामुळे आता या प्रकरणात काय घडामोड घडते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. खरंच आमदार काळे यांनी माजी विश्वस्तांना ईडी मागे लावेल अशी धमकी दिली आहे का ? हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts