लोकसभेच्या अनुशंघाने अनेक लक्षवेधी घडामोडी अहमदनगर मतदार संघात घडल्या. यापैकी एक म्हणजे आ. निलेश लंके यांचा लोकसभेला उभे राहण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणे.
निलेश लंके यांनी आमदारकीचा राजनीनाम दिला व तो स्वीकारला देखील व त्यानंतर आजवर पुलाखालून बरेच मोठे पाणी देखील वाहून गेले ते सर्वश्रुत आहे. परंतु आता आमदार निलेश लंके यांनी राजीनामा दिल्यानंतर पारनेर मतदार संघासाठी काही भयाण वास्तव गोष्टी समोर उभ्या ठाकल्या आहेत त्या जाणून घेऊव्यात –
पारनेरसाठी आता आमदार राहिलेला नाही. त्यामुळे आत पारनेरचे प्रश्न कोण सोडवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील एक महत्वपूर्ण म्हणजे पाणी व चारा टंचाईची स्थिती सध्या येथे तीव्र होऊ लागली आहे. आता ते फक्त या प्रश्नांची मांडणी माजी आमदार म्हणून लंके प्रशासनाकडे करू शकतात.
कारण, आमदारकीच्या ताकदीवर प्रश्नांची आपल्या पद्धतीने सोडवणूक करवून घेण्यावर त्यांना आता मर्यादा आल्या आहेत. पारनेर तालुक्याला पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे व कुकडीच्या आवर्तनाची प्रतीक्षा आहे. त्याचा निर्णय झाला आहे, पण ते पाणी महिनाखेरीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निघोज, राळेगण थेरपाळ, कुरुंद, जवळे आदी भागातील शेतकरी जनावरांसह आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आता आमदार नसल्याने या आंदोलनाची तीव्रता वर पर्यंत कशी पोहोचणार हा देखील प्रश्न आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला आहे. त्यातील लंकेंच्या यशापयशावर पारनेरला कोणी वाली असणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. पारनेरला सध्या झेडपी व पंचायत समिती सदस्य नाहीत. फक्त नगराध्यक्ष आहेत. ते काही अंशी पारनेर शहराचे प्रश्न मांडून सोडवू शकतील, पण ग्रामीण भागाचे काय, असा प्रश्न आहेत.
तालुक्यात आता निलेश लंके व विजय औटी असे दोन २ माजी आमदार आहेत. जनतेचे प्रश्न ते निवेदन देऊन वा आंदोलने करून मांडू शकतील. तालुक्याच्या प्रशासनाची सूत्रे तहसीलदार व जिल्हाधिकारी स्तरावर आली आहेत. पालक मंत्री आता तालुक्याचे पालक असतील. तालुक्याचा आमदार हा तेथील जनतेचा नायक असतो.
स्थानिक प्रशासनातील विविध समित्या, पोलिस ठाणे व गावपातळीवरील विकास योजना नियोजनात आमदाराचा शब्द अंतिम मानला जातो. शिवाय जिल्हा विकास नियोजन समितीच्या सभांतून उपस्थित राहून तालुक्यासाठी विकास निधी मिळवणे व प्रश्न मांडणे शक्य होते. पण माजी आमदारांना याबाबत मर्यादा असतात. पारनेरची आमदारकी आज रिक्त असल्याने प्रशासनाला आमदार असल्याच्या अधिकारात जाब विचारायलाच कोणी नाही. आंदोलने करून प्रश्न मांडता येतील, पण प्रश्न धसास लावण्यात मर्यादा येणार आहेत.
निलेश लंके जनतेसाठी नेहमीच उपलब्ध
दरम्यान आता यात आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे निलेश लंके हे नेहमीच अडीअडचणीच्या वेळी जनतेसाठी उपलब्ध असतात. जरी ते माजी झाले असले तरी देखील जनतेसाठी, त्यांच्या प्रयत्नासाठी ते झटत, झगडतील यात शंका नाही. जर लोकसभेला यश मिळाले तर मग बाकी काही विषयच राहत नाही.
राजकीय वास्तव
दरम्यान आता आगामी काळात राजकीय परिस्थिती देखील पारनेरमधील बदलेल असे दिसते. कारण येथे टोकाच्या विरोधामुळे विखे पुरेपूर लक्ष घालतील अशी चर्चा लोक करतायेत. तसेच आगामी आमदारकीच्या उमेदवारांबाबत व पक्षांबाबत देखील अनेक घडामोडी पाहायला मिळू शकतात.
निलेश लंके यांच्या लोकसभेच्या यशापशयावर त्यांची आमदारकीची पुढील गणिते वेगळी असतील. तसेच माजी आ. विजय औटी यांच्यावर देखील उभाठा गटाने कारवाई केलेली आहे त्यामुळे ते देखील काय भूमिका घेतात यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतील. आगामी काळात येथील राजकीय गणितेही आता बदलेली पाहायला मिळतील हे मात्र नक्की.