विधानसभा निवडणूक

अजितदादांचा निलेश लंके यांना इशारा; ….तर आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार

Ajit Pawar On Nilesh Lanke : अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. खरतर येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. आगामी लोकसभेत जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाचा उमेदवार उभा राहणार आहे. भाजपाने विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तिकीट दिले आहे.

यामुळे महायुतीमध्ये समाविष्ट असलेले अजित दादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे नाराज आहेत. खरेतर निलेश लंके यांना नगर दक्षिणमधून लोकसभा लढवायची आहे.

हेच कारण आहे की सुजय विखे यांना भाजपा कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच निलेश लंके यांनी अजितदादा यांना सोडचिट्टी देत ‘शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी समोर आली आहे.

आज दुपारी 4 वाजता निलेश लंके हे सुप्रीमो शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षात प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे.

मात्र, निलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडली तर लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित दादा यांच्या गटाला मोठा धक्का बसणार असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

रम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी असे म्हटले आहे की, ‘लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांनी एका मंत्र्यांविरोधात माझ्याकडे तक्रार केली. त्यांच्यासमोर सतत अडचणी येत आहेत.

मी त्यांना आश्वासित केलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि आपण एकत्र बसू. तुम्हाला ज्या मंत्र्यामुळं त्रास होतो, त्यांनाही आपण बोलवुया. जे समज-गैरसमज झाले असतील ते सोडवुया. पण तू व्यवस्थित राहा, चुकीचा निर्णय घेऊ नको, अशी मी त्यांची समजूत घातली होती.’

…तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल 

अजित दादा यांनी जर राष्ट्रवादीतून निलेश लंके बाहेर पडलेत तर काय होईल ? याबाबत देखील सांगितले आहे. अजित पवार यांनी या प्रकरणात पुढे बोलताना असे म्हटले की, “निलेश लंके आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांना व्हिप लागू झालेला आहे.

त्यांनी जर स्वतः वेगळा निर्णय घेतला तर त्यांना राजीनामा देऊनच निवडणुकीला उभं राहावं लागेल.” अर्थातच जर निलेश लंके यांना आगामी लोकसभा लढवायची असेल तर राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असा इशारा त्यांनी निलेश लंके यांना दिला आहे.

यावेळी अजितदादा यांनी विरोधकांकडे लोकसभेसाठी उमेदवार नसल्याने लंके यांना स्वतःकडे खेचले जात असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकालाच आपला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts