विधानसभा निवडणूक

सगळ्याच एक्झिट पोलचे अंदाज फेल! फक्त ‘या’ एक्झिट पोलचा अंदाज ठरला खरा आणि अचूक

Exit Poll:- विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत असून आतापर्यंतच्या हातात आलेल्या निकालानुसार राज्यामध्ये महायुतीचा वारू सुसाट असल्याचे आपल्याला दिसून आले असून महाविकास आघाडीचा मात्र पूर्ण धुव्वा उडाल्याचे चित्र आहे. यावेळची विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लढत होती.

आपल्याला माहित आहे की 20 नोव्हेंबर 2024 रोजी या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली होती निवडणूक प्रक्रिया पार पडल्याच्या दिवशी अनेक एक्झिट पोल जाहीर करण्यात आले होते व त्यामध्ये प्रत्येक एक्झिट पोलने वेगवेगळे अंदाज दाखवले होते. यामध्ये बऱ्याच एक्झिट पोल नुसार राज्यामध्ये महायुतीला 160 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता.

तर काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांना कोणालाही बहुमत मिळणार नाही असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला होता. परंतु आजचा निकाल पाहता सगळेच एक्झिट पोल हे जवळपास फेल ठरल्याचे दिसून येत आहे.

परंतु यामध्ये ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल हा जवळपास आजच्या निकालांच्या आकड्याच्या जवळपास असल्याचे आपल्याला दिसून आले असून हा अंदाज अचूक ठरताना दिसत आहे.

ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल ठरला अचूक
ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल नुसार बघितले तर त्यांच्या मते या निवडणुकीत महायुती 200 जागांवर विजय मिळविला असा त्यांनी अंदाज व्यक्त केला होता व इतकेच नाही तर झारखंडमध्ये इंडिया आघाडी जिंकेल असा देखील त्यांनी अंदाज व्यक्त केला होता.

जर आपण त्याचा निकाल बघितला तर सुरुवातीपासूनच महायुती 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असल्याचे आपल्याला दिसून आले तर महाविकास आघाडी फक्त 50 जागांवर राहिली. या पोलच्या अंदाजानुसार महायुतीला राज्यापेक्षा 178 ते 200 जागांवर विजयाचा अंदाज त्यांनी वर्तवला होता व महाविकास आघाडी ८२ ते १०२ जागांवर विजय होईल अशी त्यांनी शक्यता वर्तवली होती.

तसेच या पोलने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील मतांचे अंतर 11% असेल अशी देखील शक्यता वर्तवली होती. यामध्ये महायुतीला 48% तर महाविकास आघाडीला 37% मते मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. जवळपास त्यांनी वर्तवलेला हा अंदाज बऱ्याच अंशी खरा ठरताना दिसून येत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts