विधानसभा निवडणूक

‘बाळासाहेब थोरात हे रिटायर्ड झालेले नाहीत, ते तर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री….’ थोरात यांच्या लेकीची प्रतिक्रिया चर्चेत

Balasaheb Thorat News : आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसचे ताकतवर नेते म्हणून त्यांची ओळख आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे मोठे वजन आहे. राज्याच्या राजकारणात त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. दरम्यान आता थोरात यांची पुढील पिढी सक्रीय राजकारणात आली आहे.

त्यांच्या लेकीने अर्थातच जयश्री थोरात यांनी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला असून त्यांच्यावर पक्षाने एक महत्त्वाची जबाबदारी देखील सोपवली आहे. जयश्री ताईंची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

खरे तर, जयश्री थोरात या गेल्या काही दिवसांपासून आपले वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समवेत राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत होत्या.

पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते आवर्जून सहभाग घेत होते. यावरून ते लवकरच सक्रिय राजकारणात येणार हे स्पष्ट झाले होते.

मात्र, जयश्री ताईंची काँग्रेसमध्ये येण्याचा मुहूर्त काही ठरत नव्हता. आता मात्र त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे पक्षप्रवेशा बरोबरच त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. पक्षाने त्यांना संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपद देऊ केले आहे.

तसेच पुढील काळात जयश्रीताई संपूर्ण वेळ राजकारणाला देतील, ते पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असतील अशा चर्चा देखील आहेत. त्यामुळे थोरात यांची पुढील पिढी आता सक्रिय राजकारणात आली आहे. यामुळे नगर जिल्ह्यात नवीन थोरात पर्व सुरू होणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

मात्र, बाळासाहेब थोरात यांची नवीन पिढी आता राजकारणात आली असल्याने थोरात साहेब हे राजकारणापासून दूर जाणार का ? हा मोठा सवाल उपस्थित होत होता. दरम्यान या प्रश्नाचे उत्तर बाळासाहेब थोरात यांच्या कन्येनेच दिले आहे.

काँग्रेसने जयश्री ताई यांना संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी आपल्या पित्याबाबत अर्थातच बाळासाहेब थोरात यांच्या विषयी एक मोठे विधान केले आहे. जयश्री थोरात यांनी त्यांचे वडील बाळासाहेब थोरात हे रिटायर्ड झालेले नाहीत.

ते मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सर्वांचीच इच्छा आहे.

पुढे राजकारणात संधी मिळाल्यास नक्कीच विधानसभा लढवेल’, असे विधान केले आहे. यावरून आगामी विधानसभेत जयश्री थोरात या आमदारकीसाठी उभ्या राहणार हे स्पष्ट होत आहे. यानिमित्ताने त्यांनी त्यांची राजकीय चुणूक स्पष्ट केली आहे. जयश्री थोरात यांनी राज्यासह देशाच्या राजकारणात आमदार बाळासाहेब थोरात हे सक्रिय आहेत.

मी पक्षातून काम सुरू केले म्हणजे साहेब रिटायर्ड झाले नाहीत. ते पहिल्यापेक्षा राज्याच्या राजकारणात अधिक सक्रिय आहेत. त्यांच्या इतका संवेदनशील आणि प्रभावशाली राजकीय नेता मी राजकारणात पाहिलेला नसल्याची भावना यावेळी बोलून दाखवली आहे.

तसेच त्यांनी बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. आम्हाला काँग्रेससाठी चांगले काम करायचे आहे. तसेच भविष्यात संधी मिळाली, तर नक्कीच विधानसभा निवडणूक लढेल असे जयश्री थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts