Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी आता प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.
अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर बारामती मध्ये महाविकास आघाडी कडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार उभे करणार आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर सुप्रीमो शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि महायुतीमधील अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार यांची लढत होणार आहे. मात्र ही लढत आता तिरंगी होणार असे चित्र आहे.
कारण की, बारामती लोकसभा मतदारसंघातून नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय गव्हाळे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गव्हाळे अपक्ष म्हणून यंदाची निवडणूक लढवणार अशी माहिती समोर आली आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक काटेदार आणि रंगतदार अशी होणार आहे. विजय गव्हाळे यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे.
बारामती मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत गव्हाळे यांनी आपण अपक्ष उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात होणारी लढत आता गव्हाळे यांच्या एन्ट्रीमुळे तिरंगी होणार आहे.
दरम्यान, यावेळी माजी नगरसेवक गव्हाळे यांनी पवार कुटुंबावर हल्ला चढवला आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हटले की, सध्याची बारामती मधील स्थिती ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे.
दरम्यान आपण विस्थापितांचा प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीत उभे राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जे मतदार दोन्ही पवारांना अर्थातच शरद पवार आणि अजित पवार यांना कंटाळलेले आहेत त्या मतदारांसाठी आपला उमेदवारी हा योग्य पर्याय असल्याचा दावा गव्हाळे यांनी यावेळी केला आहे.
पवार कुटुंबावर हल्ला चढवतांना गव्हाळे यांनी राजकारणात कोणीच आपल्याला वरचढ होऊ नये याची काळजी पवार कुटुंबियांनी कायमच घेतली आहे, जनतेला वेठीस धरण्याचे, अनेक कर्तृत्ववान माणसे संपविण्याचे काम त्यांनी केले असल्याचे यावेळी म्हटले आहे.