अहमदनगर दक्षिणेची निवडणूक नेहमीच चर्चेत राहणारी होते असा इतिहासच हे जणू. यंदाची लोकसभा घ्या किंवा मागील वेळीही गाजलेली लोकसभा घ्या. दक्षिणेतील सर्वात गाजलेली निवडणूक म्हणजे 1991 ची लोकसभा निवडणूक.
स्व. माजी मंत्री बाळासाहेब विखे यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख अशी ही लढत झाली व ही लढत केवळ नगरकरांच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक अशी निवडणूक ठरली. दोघेही काँग्रेसचेच पण विखे यांना तिकीट नाकारल्यानंतर ते बंड करत अपक्ष उभे राहिले होते. ही निवडणूक झाली तेव्हा देशाचे पंतप्रधान राजीव गांधी राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार हे होते.
१९९१ ला अहमदनगर दक्षिण आणि कोपरगाव अशा पद्धतीचे हे दोन मतदारसंघ होते. यापैकी दक्षिण मतदारसंघाची नेहमीच चर्चा होत आली आहे. कोपरगावमधून बाळासाहेब विखे पाटील हे निर्विविद निवडून यायचे.
दरम्यान त्यावेळी विश्वनाथ प्रतापसिंह व राजीव गांधी यांच्या राजकीय संघर्षामध्ये विखे पाटील हे व्ही. पी. सिंह यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र असल्याने काँग्रेस श्रेष्ठी विखेंचे तिकीट नाकारतील असे चित्र होते. दरम्यान यावेळी (१९९१) विखे पाटील दक्षिण मतदारसंघातून उभे राहतील या चर्चानी जोर धरला. पण काँग्रेसने जेव्हा तिकीट जाहीर केले तेव्हा 1989 च्या सर्व खासदारांना दिले पण देशातून केवळ तीन तिकिटे कापली व त्यात एक विखेंचं तिकीट कापले होते. त्यानंतर विखे दक्षिणेतून काँग्रेस उमेदवाराविरोधात बंड करून अपक्ष उभे राहिले होते.
एका मीडियाने दिलेल्या रिपोर्टच्या हवाल्याने, असं म्हटलं जाते की विखे पाटलांच्या विरोधात लढण्याची गडाख यांची इच्छा तर नव्हतीच पण गडाख यांनी तसा निरोपही विखे पाटलांना दिला होता. तुम्ही काँग्रेसमधेच राहा , तुम्ही काँग्रेस सोडणे म्हणजे जिल्हा व पक्ष यांच्यासाठी हे बरोबर नसल्याचे व वाटले तर मी थांबतो असेही गडाख विखे यांना म्हटले होते.
तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव निलंगेकर यांच्याशी गडाखांनी त्याबाबत बोलणेही केले व तसा निरोप हायकमांड पर्यंत गेलाही. परंतु त्यावेळी “गडाखजी को ही लडना होगा’” असा आदेशच जणू राजीव गांधी यांनी दिला होता. शेवटी गडाख यांची उमेदवारी जाहीर झाली व विखे विरोधात गडाख अशी फाईट झाली.
गडाख म्हणतात की त्यानंतर मग ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माझ्या मतदारसंघात जास्तीत जास्त सभा घेऊन माझे बळ वाढविलेच शिवाय मित्र म्हणून आधार देखील दिला. परंतु मी राजीव गांधी यांची सभा नगरला झाली पाहिजे यासाठी आग्रही होतो व तसा प्रयत्नही करत होतो. या प्रयत्नाला यश देखील आले होते व स्वतः गांधी हे नगरमध्ये सभा घेतील असा शब्द बीडच्या सभेत दिला होता तसेच ‘किसी भी हालत में यह सीट आनी चाहिए’ असे ते शरद पवारांना म्हणाले होते असे गडाख आपल्या पुस्तकात लिहितात.
दरम्यान त्यानंतर तीन-चार दिवसांतच राजीव गांधींचे हत्या प्रकरण झाले व देश ढवळून निघाला होता. या घटनेमुळे निवडणूक लांबली गेली होती व पुढील मग गडाख-विखे यांच्या जयविजय व न्यायालयीन लढाईचा इतिहास तर तुम्हाला माहीतच आहे…