BJP MP List : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. 16 जून 2024 ला 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 18 व्या लोकसभेसाठी मतदान घेतले जाणार आहे. आगामी लोकसभेसाठी लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.
कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकते. दरम्यान, राजकीय पक्ष देखील आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. नुकत्याच तीन-चार दिवसांपूर्वी भाजपाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
या पहिल्या यादीत मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव समाविष्ट नव्हते. मात्र, पहिल्या यादीची विशेषता म्हणजे या पहिल्या यादीत बीजेपीने आपल्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांना देखील तिकीट नाकारले गेले आहे.
यामुळे आता महाराष्ट्रातील भाजपाच्या विद्यमान खासदारांचे देखील टेन्शन वाढले आहे. महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला तथा अजित पवार यांच्या गटाला किती जागा मिळणार अशा चर्चा सुरू असतानाच भाजपाच्या विद्यमान खासदारांची देखील चांगलीच धाकधूक वाढली आहे.
बीजेपीने आपल्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान खासदारांचे तथा केंद्रीय मंत्र्यांचे तिकीट कापले असल्याने महाराष्ट्रात देखील भाजपाच्या अनेक खासदारांना डच्चू दिला जाऊ शकतो अशा चर्चा आहेत. यामुळे भाजप खासदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने राज्यातील विद्यमान खासदारांचे तीन सर्व्हे केले होते. यामध्ये अनेक खासदारांची कामगिरी असंतोषजनक पाहायला मिळाली आहे. यामुळे 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत या खासदारांना तिकीट मिळणार नाही असे बोलले जात आहे.
ज्यांचा कामाचा स्ट्राइक रेट चांगला नाही त्यांना आगामी निवडणुकीत तिकीट मिळणार नाही अशी भूमिका भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेली आहे. उमेदवारी देताना गेल्या पाच वर्षात विद्यमान खासदारांनी कशी कामगिरी केली आहे हाच निकष भाजपाचे केंद्रीय नेतृत्व लावणार आहे.
येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची यादी जाहीर होईल यामध्ये डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता कट होईल आणि नवीन उमेदवारांना संधी मिळेल अशी शक्यता आहे. दरम्यान आता आपण भाजप कोणत्या मतदारसंघात नवीन उमेदवार उतरवू शकतो आणि विद्यमान खासदारांना धक्का देऊ शकतो याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या जागांवर दिसणार भाजपाचा नवीन उमेदवार
बीड, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नांदेड, अहमदनगर, वर्धा आणि रावेर या लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो.
या ठिकाणी भाजप नवीन उमेदवार देणार अशा चर्चा आहेत. तथापि याबाबत जेव्हा भाजप महाराष्ट्राची उमेदवारांची यादी जाहीर करेल तेव्हाच नेमकी पक्षाची भूमिका समजू शकणार आहे.