Eknath Shinde Shivsena Candidate List : सध्या संपूर्ण देशभरात यंदा होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष आगामी निवडणुकीत विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. राजकीय नेत्यांनी देखील आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
काही राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. मात्र असे असले तरी अजूनही भाजपा वगळता इतर राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. यावरून महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावरून गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
भारतीय जनता पक्षाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 20 अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पण, एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून अजूनही अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही.
पण, आज शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते याची संभाव्य यादी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून एकनाथ शिंदे यांचा गट 14 जागांवर निवडणूक लढवू शकते.
यातील 12 जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यात शिर्डीची जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाणार अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी शिंदे गट विद्यमान तीन खासदारांचे तिकीट कापण्याची शक्यता आहे.
चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लोकसभा निवडणुकीत कोणाला संधी दिली जाऊ शकते अन कोणाचे तिकीट कापले जाऊ शकते.
एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी आणि त्यांचे मतदारसंघ
हिंगोली लोकसभा मतदारसंघ : शिंदे यांच्या गटाकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
मावळ लोकसभा मतदारसंघ : श्रीरंग बारणे यांना या जागेवरून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
वाशिम : विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या ऐवजी या जागेवरून संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाणार अशा चर्चा आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ : धैर्यशील माने
शिर्डी : या जागेवरून पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी मिळणार असे चित्र आहे.
नाशिक : नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते आणि त्यावेळी हेमंत गोडसे यांना या जागेवरून उमेदवारी दिली जाणार असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. यावरून हेमंत गोडसे हे या जागेवरून संभाव्य उमेदवार ठरत आहेत.
रामटेक : कृपालजी तुमाणे यांचे तिकीट कापले जाईल अशी शक्यता आहे.
कल्याण : श्रीकांत शिंदे यांना या जागेवरून तिकीट दिले जाणाऱ अशा चर्चा आहेत.
इशान्य मुंबई : राहुल शेवाळे यांना या जागेवरून पुन्हा संधी मिळणार आहे.
पालघर : राजेंद्र गावीत यांना तिकीट मिळू शकते.
बुलढाणा : प्रतापराव जाधव यांना या जागेवरून तिकीट दिले जाणार अशा चर्चा आहेत.
कोल्हापूर : संजय मंडलिक यांना डच्चू मिळू शकतो. पण या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या गटाचाच उमेदवार उभा राहणार असे चित्र आहे.