Lok Sabha Election : लवकरच लोकशाहीचा महाकुंभ सजणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुका संदर्भात राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्या स्थितीला देशभरात राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे.
भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. काँग्रेसने देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे.
पण महाराष्ट्रातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अजूनही निश्चित झालेले नाहीत. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा गदारोळ अजून संपलेला नसल्याचे चित्र असून यामुळे महाविकास आघाडी मधील कोणत्याच पक्षाचे अधिकृत उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीत.
अशातच मात्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत असून यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी एनसीपी शरद पवार गटातील संभाव्य उमेदवारांची यादी हाती आली आहे. शरद पवार यांच्या गटाकडून येत्या लोकसभा निवडणुकीत कोणाला संधी दिली जाऊ शकते याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला मिळणार उमेदवारी ?
माढा लोकसभा मतदारसंघ : धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव या जागेसाठी आघाडीवर आहे. धैर्यशील मोहिते पाटील ‘शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’त सामील होतील आणि त्यांना या जागेवरून एनसीपी शरद पवार गट तिकीट देणार अशा चर्चा आहेत.
अहमदनगर दक्षिण : नगर दक्षिण मधून भाजपाने डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अशातच, आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निलेश लंके यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी माहिती हाती आली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघ : विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांची नाव या जागेसाठी चर्चेत आली आहेत.
वर्धा लोकसभा मतदारसंघ : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर नितेश कराळे मास्तर यांना संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघ : या जागेवर संसदरत्न तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत. विशेष म्हणजे या जागेवर अजितदादा यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळेल असे म्हटले जात आहे. यामुळे या जागेवरील निवडणूक ननंद भावजाई यांच्यात रंगणार का? हे पाहण्यासारखे राहणार आहे.
दिंडोरी : भास्कर भांगरे यांचे नाव चर्चेत आहे.
भिवंडी : बाळ्यामामा म्हात्रे यांना संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत.
शिरूर : पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना या जागेवरून संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रावेर : संतोष चौधरी यांना ‘शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ तिकीट देणार अशी बातमी आहे.