विधानसभा निवडणूक

मंत्री राधाकृष्ण विखेंचे वजन भाजप हायकमांडलाही मान्य ! आगामी लोकसभेसाठी मोठी जबाबदारी दिली

आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आलेल्या असून भाजपने ४०० पार जाण्यासाठी कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला बहुमत प्रस्तापित करत तिसऱ्यांदा सत्तेत यायचे आहे. भाजपने बहुतांश उमेद्वार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातही उमेद्वारे जाहीर झाले आहेत.

आता यानंतर मोठा भाग म्हणजे प्रचार सभा. स्टार प्रचारक या सभांसाठी सवर्त्र दौरे करत असतात. भाजपने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे.

त्यामुळे आता आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या खांद्यावर असणार आहे. स्टार प्रचारकांमध्ये मंत्री विखे यांना स्थान मिळणे म्हणजे एकप्रकारे त्यांची ताकद केंद्राला मान्य आहे असाच मासेज यातून निघतो अशी चर्चा आहे.

अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील स्टार प्रचारक
भाजपकडून जी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे त्यात ४० नेत्यांचा समावेश असून सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या यादीत जगतप्रकाश नड्डा, राजनाथ सिंह,

अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ आदी पॉवरफुल नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील स्टार प्रचारक नेत्यांचा विचार केला तर यात एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील आदींसह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे.

स्टार प्रचारक म्हणजे काय?
आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की स्टार प्रचारक म्हणजे काय? तर ज्यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी, ज्यांच्या रॅलीमुळे प्रचंड लोक गर्दी करतात अशा व्यक्तींना स्टार प्रचारक असे म्हणतात अशी कॉमन व्याख्या आहे.

या स्टार प्रचारकांमुळे त्या पक्षाला मत मिळण्यास फायदा होत असतो असे म्हटले जाते. दरम्यान या स्टार प्रचारक यांच्या सभा, प्रवास यावर खूप खर्च होतो व हा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात मोजला जात नसल्याने हा सर्व खर्च पक्षाकडून होत असतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts