विधानसभा निवडणूक

डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा ‘मैं हू डॉन’ गाण्यावर तुफान डान्स ! व्हिडीओ झाला व्हायरल, पण, विखेंचा ईशारा कोणाला ? खासदार महोदय म्हणतात….

MP Sujay Vikhe Patil Viral News : भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि भाजपाकडून या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आगामी लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. अजून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.

मात्र उमेदवारांची नावे जाहीर होण्याआधी भाजपा आपल्या अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार अशा चर्चा आहेत. यामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे देखील तिकीट कापले जाऊ शकते असा दावा होत आहे. मात्र सुजय विखे पाटील हे या जागेवरून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे.

मागे त्यांनी आपल्या मतदारसंघात चणाडाळ वाटप आणि साखर वाटपाच्या माध्यमातून मत पेरणी सुरू केली होती. आता त्यांनी आपल्या मतदारसंघात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू करत जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.

ते 2019 मध्ये पहिल्यांदाच या जागेवरून खासदार म्हणून संसदेत पोहोचले होते. आता पुन्हा एकदा या जागेवरून संसदेत जाण्यासाठी ते इच्छुक आहेत.

यासाठी गेल्या आठवड्याभरापासून जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुजय विखे यांचे आपल्या मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमांना मतदार संघातून उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आडून विखे यांनी आगामी लोकसभेसाठी ग्राउंड तयार करण्यास सुरुवात केली असल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान अशाच एका कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खासदार महोदय ‘मै हु डॉन’ या गाण्यावर थिरकत आहेत. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी देखील तुफान डान्स केला आहे. कार्यकर्ते देखील या दोघा नेत्यांसमवेत थिरकत आहेत. कार्यकर्त्यांनी या दोघा नेत्यांना खांद्यावर घेऊन नाचवले आहे.

यामुळे सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. एकीकडे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजप कोणाला संधी देणार ? पुन्हा एकदा विखे पाटील यांना तिकीट मिळणार का ? अशा चर्चा सुरू असतानाच विखे पाटील यांनी ‘मै हु डॉन’ या गाण्यावर मैफिल सजवली आहे. यामुळे विखे पाटील आपल्या गाण्यातून कोणाला इशारा देत आहेत. असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

दुसरीकडे, त्यांच्या या नवीन अंदाजामुळे स्वपक्षीय नेत्यांच्या माध्यमातून तसेच विरोधकांच्या माध्यमातून नाक मुरडली जात आहेत. दरम्यान यावर विखे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांनी विखे यांना मै हु डॉन या गाण्यावर ठेका धरत विखे यांनी नेमका कोणाला इशारा दिला आहे, असा प्रश्न विचारला होता. यावर विखे यांनी खळखळून हसत असे म्हटले आहे की, ‘मी काही डॉन वैगेरे नाही.

मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे.’ त्यांनी अमिताभ बच्चन हे त्यांचे आवडते अॅक्टर असल्याचे सांगितले आहे. विखे म्हणतात, “अरे, कमालच झाली ! माणसाने एन्जॉय देखील करायचे नाही का ? या गाण्यातील डान्स स्टेप फेमस झालेली आहे. त्यामुळे मी या गाण्यावर डान्स करतो. तुम्ही मला एखादे गाणं सांगा. मी गाणं बदलून घेतो. हा काही कोणाला इशारा वगैरे नाही आहे. जनतेचे प्रेम आहे. कार्यकर्ते म्हणतात, ते गाणं वाजवा म्हणून ते वाजवले जाते.

अमिताभ बच्चन हे माझे आवडते कलाकार आहेत. मूळ म्हणजे, ‘मैं हू डॉन’ असलेल्या गाण्याचा चित्रपट मला आवडतो. मनापासून चित्रपट आणि गाणं देखील आवडते, म्हणून त्यावर डान्स होतो. मला कोणालाही इशारा द्यायचा नाही. मी फार सामान्य माणूस आहे. मी काही डॉन वैगेरे काही नाही. जे डॉन असतील, त्यांना ते गाणं सुट होईल. माझ्याशी हे गाणं लिंकअप करण्याची काहीही गरज नाही.

एकंदरीत महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. दुसरीकडे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपा दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला संधी देणार अशा चर्चा आहेत. अशातच मात्र विखे यांनी हा डान्स केला असल्याने या डान्सची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. यामागे देखील काही राजकीय संकेत आहेत का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts