विधानसभा निवडणूक

निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत आमदार रोहित पवार यांचे खळबळजनक विधान, म्हणालेत की, अनेक आमदार शरद पवार यांच्या….

Rohit Pawar On Nilesh Lanke : नगरच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके यांचे नाव चर्चेत आहे. लंके हे अजितदादा यांच्या गटात होते. पण त्यांनी आता अजितदादा यांची साथ सोडली आहे. ते पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे परतले आहेत. निलेश लंके यांनी अधिकृतरित्या काल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे.

ते पारनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र त्यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असून शरद पवार यांच्या गटात एन्ट्री केली आहे.

यामुळे ते आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राहणार हे फिक्स झाले आहे. निलेश लंके हाती तुतारी घेऊन आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांना आव्हान देणार आहेत.

यामुळे यंदाची निवडणूक अधिक देखणी होईल अशी आशा आहे. जरी यंदाची निवडणूक निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी होत असली तरी देखील प्रत्यक्षात मात्र शरद पवार विरुद्ध विखे असा हा रंगतदार सामना होणार आहे.

नगरमध्ये पुन्हा एकदा विखे विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या गटात अधिकृतरित्या प्रवेश घेतल्यानंतर शरद पवार यांचे नातू, आमदार रोहित पवार यांनी एक मोठे विधान केले आहे.

त्यांच्या या विधानाने मात्र सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी ‘निलेश लंके आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत काल त्यांनी राजीनामा दिला आहे.

हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है ! अनेक आमदार आमच्या आणि साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेकांना आपण परत घेऊ,’ असे विधान करत पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे.

यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. खरे तर आतापर्यंत भाजपामध्येच आणि महायुती मधील इतर मित्र पक्षांमध्येच नेत्यांची इनकमिंग सुरू होती.

पण निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर रोहित पवार यांनी अनेक आमदार आमच्या आणि साहेबांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

यामुळे आता खरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात देखील आमदारांची आणि नेत्यांची इनकमिंग सुरू होणार का हा सवाल आहे. 

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Recent Posts