विधानसभा निवडणूक

अहमदनगर जिल्ह्यात निवडणूक विभागाची लोकसभेसाठी जय्यत तयारी

Ahmednagar News : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाची सध्या जय्यत तयारी सुरू असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडणूक विषयक विविध बैठका व प्रशिक्षण प्रक्रिया होत आहेत.

३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३०७ मतदान केंद्रे असून तीन तालुक्यात विभागलेल्या या मतदारसंघात राहुरी तालुक्यात १९८ मतदान केंद्रे आहेत तर पाथर्डी तालुक्यातील ५९ मतदान केंद्र तर नगर तालुक्यात ७० मतदान केंद्रांचा यात समावेश आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरचे पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नामदेव पाटील, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विशाल सदनापूर, ए. के. टेमक आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ही तयारी सध्या सुरू आहे.

नुकतेच ३०७ मतदान केंद्र अधिकाऱ्यांची बैठकीत प्रशिक्षणासह मतदार जागृती, ८५ प्लस अर्थात ज्येष्ठ नागरिकांसाठीची माहिती, दिव्यांगासाठीची माहिती तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांची माहिती आदी विषयांवर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

याशिवाय राखीव अधिकाऱ्यांसह मतदारसंघातील ३५ क्षेत्रीय अधिकारी यांचेही प्रशिक्षण घेण्यात आले. राहुरी तालुक्यातील विविध महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थी, प्राध्यापकांना नोडल अधिकारी व कॅम्पस अॅम्बेसिडरची आणखी एक कार्यशाळा पार पडली.

त्यात मतदार नाव नोंदणी मतदार करण्यासाठीची जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धा पथनाट्य व अन्य जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात आले. एकंदरीत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या पार्श्वभूमीवर राहुरी मतदारसंघातील निवडणूक प्रशासन अॅक्शन मोडवर आलेले दिसून येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts