Sujay Vikhe Patil News : 18 व्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ केंद्रस्थानी राहिल्याचे आपण पाहिले. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याअगोदरपासूनचं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. पारनेर चे माजी आमदार निलेश लंके हे महाविकास आघाडी कडून आणि भारतीय जनता पक्षाचे सुजय विखे पाटील महायुतीकडून निवडणुकीच्या आखाड्यात होते.
ही निवडणूक शरद पवार गटातील निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यात जरी झाली असली तरी प्रत्यक्षात शरद पवार विरुद्ध विखे अशीच ही निवडणूक झाली. या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. लंके यांच्याकडूनही या निवडणुकीत आपली पूर्ण यंत्रणा उतरवली गेली होती.
नगर दक्षिण मध्ये दोन्ही उमेदवार तुल्यबळ होते. त्यामुळे ही निवडणूक अगदीच अटीतटीची झाली आणि या अटीतटीच्या लढतीत निलेश लंके यांनी बाजी मारली. लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आणि ते खऱ्या अर्थाने निवडणुकीत जायंट किलर ठरलेत.
दरम्यान लोकसभा निवडणुकीचा थरार संपल्यानंतर आता सुजय विखे पाटील पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या होम ग्राउंड वर अर्थातच शिर्डीवर आता लक्ष केंद्रित केले आहे.
त्यांनी सर्वच स्तरावरील नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्या होम ग्राउंड वरील नागरिकांचा सुजय विखे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामुळे विखे पाटील हे खूपच गदगद झाले आहेत. माजी खासदारांनी आता शिर्डी सह परिसरात आपले लक्ष केंद्रित केले आहे.
तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत शिर्डीच्या गुरुस्थान येथील महिलांनी त्यांच्या समस्येचे एक निवेदन सुजय विखे पाटील यांना दिले होते. महिलांनी त्यांच्या भागातील ड्रेनेज, नवीन विज डीपी आणि कचरा समस्या बाबत तक्रार करत स्वातंत्र्य घंटागाडी देणे बाबत सुजय विखे यांना निवेदन दिले होते.
त्यावेळी सुजय विखे पाटील यांनी मी स्वतः गुरुस्थान नगर येथे येऊन समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेल असा शब्द दिला होता. ते 27 जूनला गुरुस्थान नगर येथे दाखल होणार होते. मात्र ठरलेल्या वेळेआधीच म्हणजेच काल, 25 जून लाच सुजय विखे पाटील यांनी गुरुस्थान नगर गाठले. यावेळी त्यांनी निवेदन देणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.
विशेष म्हणजे यावर ताबडतोब ॲक्शन घ्यावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. आपल्या समस्येवर समाधान काढल्याने या भागातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी येथील महिलांनी सुजय विखे पाटील यांचे आभारही मानलेत. यावेळी सुजय विखे पाटील यांनी व्यस्त असल्यामुळे येथे इच्छा असतानाही येऊ शकलो नाही.
पण आज इथे आल्यानंतर मला घरात आल्यासारखे वाटले. येथील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सर्व घरातले आहेत आणि घरातील सर्व प्रश्न कुटुंबप्रमुख सोडवतो यामुळे कुटुंबप्रमुख या नात्याने हे सर्व प्रश्न पुढील दोन महिन्यात सोडविले जातील असे आश्वासन यावेळी सुजय विखे पाटील यांनी संबंधित नागरिकांना दिले आहे.
यावेळी विखे पाटील यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी तयारी करणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी आगामी काळात एक योजना सुरू करणार अशी माहिती देखील दिली आहे. याची घोषणा सुजय विखे पाटील हे त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी करणार आहेत.
एकंदरीत पराभवानंतर सुजय विखे पाटील हे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी आपल्या होम ग्राउंड वर अर्थातच शिर्डी व आजूबाजूच्या परिसरात आता नव्या उमेदीने लोकांच्या भेटीगाठी घेण्यास आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसत आहे.