विधानसभा निवडणूक

मतदार ओळखपत्र हरवले आहे का? नका घेऊ टेन्शन! 1 मिनिटात मिळवा मतदार ओळखपत्राची डुप्लिकेट कॉपी, वाचा आवश्यक प्रक्रिया

सध्या लोकसभा निवडणूक 2024 ची धामधुम संपूर्ण भारतात सुरू असून पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 एप्रिल रोजी होणार आहे. महाराष्ट्रमध्ये जवळपास पाच टप्प्यात ही निवडणूक होणार असून चार जून रोजी या संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सव म्हटल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणे हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु आपल्याला माहित आहे की मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार ओळखपत्र हे आवश्यक असते.

परंतु बऱ्याचदा चुकून मतदार ओळखपत्र हरवते किंवा ते  खराब होते. जर तुमचे देखील मतदार कार्ड हरवले असेल किंवा चुकून ते काही कारणास्तव खराब झाले असेल तर काळजी करण्याची गरज नसून तुम्हाला मतदार कार्डाची डुप्लिकेट कॉपी मिळवता येते. ही एक ऑनलाईन प्रक्रिया असते व त्याद्वारे तुम्ही घरी बसून मतदार कार्डची डुप्लिकेट प्रत करिता अर्ज करू शकतात. यासंबंधीची माहिती या लेखात घेऊ.

 डुप्लिकेट मतदार पत्राची कॉपी मिळवण्यासाठी अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

1- याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.

2- त्या ठिकाणी गेल्यानंतर ऑनलाईन सेवा या पर्यायावर क्लिक करावे.

3- त्यानंतर यामध्ये मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे.

4- त्यानंतर तुमचे राज्य निवडावे.

5- नंतर तुमचा मतदार नोंदणी क्रमांक म्हणजेच व्हीआयडी क्रमांक एंटर करावा.

6-त्यानंतर आधार क्रमांक टाकावा.

7- आधार क्रमांक टाकल्यानंतर मोबाईल नंबरवर ओटीपी मिळतो व तो दिलेल्या जागी नमूद करावा.

8- अर्जामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती भरावी व सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

9- संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करावा.

 याकरिता कुठले कागदपत्रे लागतात?

या अर्जामध्ये कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो, आयडेंटी प्रूफ म्हणजे ओळखपत्राची प्रत(आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड ), ऍड्रेस प्रूफ म्हणजेच पत्त्याचा पुरावा म्हणून ( विज बिल, टेलिफोन बिल किंवा बँकेचे स्टेटमेंट) आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मतदार ओळखपत्र हरवले किंवा चोरीला गेले असल्यास एफआरआयची प्रत इत्यादी कागदपत्रे लागतात.

 अर्जाची स्टेटस कशी चेक कराल?

तुम्ही केलेल्या अर्जाची स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट देऊन स्टेटस तपासू शकता.

 अर्ज करण्यासाठी किती पैसे लागतात?

तुमच्या मतदार कार्ड हरवले असेल व तुम्हाला डुप्लिकेट मतदार ओळखपत्र हवे असेल व त्याकरिता तुम्ही अर्ज केला तर त्याकरिता कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

 अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी मतदार कार्ड जारी केले जाते?

साधारणपणे डुप्लिकेट मतदार ओळखपत्र पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये जारी केले जाते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts