Animal OTT Release : एक डिसेंबर 2023 रोजी संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ऍनिमल हा चित्रपट गेल्या सात दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. रणबिर कपूर, रश्मीका मंदाना, अनिल कपूर, शक्ती कपूर, बॉबी देवल, सुरेश ओबेरॉय यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारलेला हा चित्रपट सध्या भारतात चर्चेचा विषय आहे. या चित्रपटांवर अनेक लोक फिदा झाले आहेत तर काहींनी या चित्रपटावर सडकुन टीका केली आहे.
स्त्रियांना कमी लेखणारा हा चित्रपट असल्याचा आरोप काही लोकांनी केला आहे. हा चित्रपट पुरुषप्रधान संस्कृतीचे दर्शन घडवतो, असे बोलले जात आहे. पण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून चित्रपटाचे यश पाहिलं तर ते नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला गदर, पठाण, जवान यांसारख्या चित्रपटांपेक्षा अधिक भासू लागले आहे. कारण की, अवघ्या सात दिवसांच्या काळात या चित्रपटाने वर्ल्ड वाईड 500 कोटींचा गल्ला जमवला आहे.
या चित्रपटाची तरुणाईत मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. खरे तर, जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासूनच या चित्रपटाबाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळाले आहेत. हा एक ॲक्शन थ्रिलर मूवी आहे. यामध्ये काही इन्टीमेट सीन देखील आहेत आणि काही हिंसक सीन देखील आहेत. पण, आता हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतरही अनेकांच्या माध्यमातून हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर केव्हा रिलीज होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता चित्रपट रिलीज होऊन जवळपास एक आठवडा पूर्ण झाला आहे मात्रा अनेकांना थियटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहता आलेला नाही. चित्रपट पाहण्याची इच्छा असूनही काही कारणास्तव अनेकांना चित्रपटगृहात जाणे शक्य होत नाहीये. अशा परिस्थितीत आज आम्ही अशा लोकांसाठी एक महत्त्वाचे आणि अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे या चित्रपटाची ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिलीज डेट ही जवळपास फिक्स झाली आहे. तसेच हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होऊ शकतो याबाबत देखील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
केव्हा अन कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज ?
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘अॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता एक आठवडा उलटला आहे. अशातच आता लोकांनी OTT वर त्याचा शोधही सुरू केला आहे. पण हा चित्रपट कोणत्या OTT वर आणि कधी प्रदर्शित होणार याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रणबीर कपूरचा अॅनिमल चित्रपट हा नेटफ्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्याची दाट शक्यता आहे.
याच्या निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाचे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सला विकले गेले आहेत. याचा अर्थ आता अॅनिमल चित्रपट थिएटरनंतर नेटफ्लिक्स ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जानेवारीच्या मध्यात OTT वर प्रदर्शित होऊ शकतो असा दावा देखील काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.