मनोरंजन

Bigg Boss 17 : बिग बॉस मधून बाहेर येताच अंकिता लोखंडे घेणार घटस्फोट?, दोघांमध्ये पुन्हा बिनसले…

Bigg Boss 17 : अभिनेत्री अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांच्या नात्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. दोघेही सध्या बिग बॉसच्या घरात असून, दोघांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे दिसत आहे. बिग बॉस मध्ये नुकताच कौटुंबिक आठवडा संपला, या नंतर दोघांमधला वाद शिगेला पोहोचला. दोघांचा वाद पाहता चाहते बिग बॉस नंतर दोघांचे नाते तुटणार असा अंदाज लावत आहे.

कौटुंबिक आठवड्यात जेव्हा दोघांच्या आईंनी त्यांना समजावून सांगितले होते. त्यानंतर दोघांनीही लढायचे नाही, असे ठरवले. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. अशातच अंकिताने मी तुला सोडत आहे असे देखील म्हंटले आहे. काय आहे प्रकरण सविस्तर पाहूया…

अंकिता आणि विकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोघे पुन्हा एकदा भांडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अंकिता बेडवर बसलेली असून विकी जेवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये विकी विचारत आहे, माझ्यात काय कमी आहे? तेव्हा अंकिता म्हणते, तुझे या नात्यात योगदान कमी आहे. त्यात एक अडचण आहे. यावर विकी म्हणतो, जेव्हा तू मुनव्वरचा हात धरून त्याला मिठी मारायची तेव्हा मलाही तसं वागायला पाहिजे होत. तुझी सर्व नाती शुद्ध आहेत आणि माझी सर्व नाती वाईट आहेत.

तेव्हा अंकिता म्हणते, मी तुझ्यासोबत असुरक्षित आहे. यावर विकी म्हणतो, हे खूप झालं आहे, मी सगळ करून थकलो आहे. तेव्हा अंकिता म्हणते, मी पण थकले आहे. मग विकी रागाने म्हणतो, तू काही केले नाहीस. मी खरे सांगू लागलो तर ती ऐकू शकणार नाही. हा प्रोमो शेअर करताना कलर्सने लिहिले, “विकी आणि अंकिता यांच्यात भांडण. या कसोटीवर त्यांचे नाते टिकेल का?”

दुसऱ्या प्रोमोमध्ये विकी बागेत बसून बोलत असल्याचे दाखवण्यात आले होते. तेवढ्यात अंकिता आली आणि विकीला म्हणाली, विकी, तुझी भांडी राहीली आहेत, तू तुझी ड्युटी पूर्ण कर. यावर विकी म्हणतो, तू कॅप्टन नाहीस, मला का बोलतेय? यावर अंकिता म्हणते, ही कसली शिष्टाचार आहे बोलायची?

यावर विकी चिडतो आणि म्हणतो की तू कॅप्टन नाहीस, मला आठवण करून देऊ नकोस. तू तुम्ही मर्यादा ओलांडली आहे. तू माझ्याशी नीट बोलला नाहीस तर माझ्याकडूनही काही अपेक्षा ठेवू नकोस. दोन लोकांसमोर मला कसे लाजवायचे ते तुला चांगले माहिती आहे. यावर अंकिता म्हणते, मला माहित नाही तुला काय झाले आहे, तू फक्त भांडतोस. मला माफ कर मला तुझ्याशी कधीच बोलायचे नाही…मी जातेय…मी तुझा पाठलाग सोडतेय…आता तू बघ तुला काय करायचं आहे.”

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts