Bigg Boss 17 : आता बिग बॉस शो शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. अशास्थितीत खेळडूंचे घरात राहणे अवघड होत चालले आहे. वीकेंड वारनंतर आता घरातील सदस्य स्वतःला नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. नुकताच एक नॉमिनेशन टास्क झाला त्यामध्ये सर्व स्पर्धक स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
नुकताच बिग बॉस 17 चा लेटेस्ट प्रोमो रिलीज झाला आहे. बिग बॉस 17 च्या या प्रोमोमध्ये बिग बॉस नॉमिनेशन टास्कची घोषणा करताना दिसत आहे. बिग बॉस घरातील सदस्यांना सांगत आहेत की, नॉमिनेशन टास्कसाठी घर दोन भागात विभागले जाईल, ज्या संघाचे लोक बर्जरसोबत दीर्घकाळ राहतील ते स्वतःला नॉमिनेशनपासून वाचवू शकतील. अशा परिस्थितीत बिग बॉस अंकिता लोखंडे, विकी जैन, मनारा चोप्रा आणि मुनावर फारुकी यांना वेगवेगळ्या टीममध्ये ठेवणार आहेत.
बिग बॉसचा हा निर्णय आता मनारा चोप्रा आणि मुनवर फारुकी यांना जड जाणार आहे. अंकिता आणि विकी त्यांच्या टीमसह मनारा चोप्रा आणि मुनावर फारुकी यांच्यावर टॉर्चर करताना दिसत आहेत. तसेच अंकिता लोखंडे टास्कच्या नावाखाली मनारा चोप्रावर वारंवार हल्ला करताना दिसली. तर विक्की जैन मुनावर फारुकीच्या मागे लागला होता.
बिग बॉस 17 च्या प्रोमोमध्ये, आयशा मनाराला टास्क अर्धवट सोडण्यास सांगत आहे. याला उत्तर देताना मनारा म्हणते, ती तिचे नाते आणि कार्य कधीच अर्धवट सोडत नाही. बिग बॉसने दिलेल्या हा टास्क आता कोण जिंकेल हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.