मनोरंजन

तारीख ठरली ! ‘या’ तारखेला OTT वर रिलीज होणारा रणवीर कपूरचा ऍनिमल, कुठं पाहता येणार ?

Animal Movie OTT Release Date : रणवीर कपूर आणि रश्मीका मंदाना या जोडीच्या उत्कृष्ट केमिस्ट्रीचा ऍनिमल हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसमधून घालत आहे. सिनेमागृहात या चित्रपटाचे शो हाउसफुल होत आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर कपूर आणि रश्मिका यांच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावलेल्या बॉबी देओलच्या अभिनयाची देखील प्रेक्षकांनी दखल घेतली आहे. बॉबीच्या करिअरला या चित्रपटामुळे एक नवीन वळण मिळू लागले आहे.

बॉबीच्या अभिनयाची भुरळ सर्वांनाच पडली आहे. एकूणच ॲनिमल चित्रपटाच्या सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या चित्रपटात दाखवलेल्या हिंसाचाराचा विरोध केला आहे तर काहींनी हा चित्रपट खूपच मनोरंजक असल्याचे सांगितले आहे.

काही लोकांनी हा चित्रपट पुरुषप्रधान संस्कृतीचे दृश्य रेखाटत असून चित्रपटात स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आले असल्याने याचा समाजावर वाईट परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. मात्र असे असले तरी प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच आवडला असून आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे.

मात्र अनेकांना सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहता आलेला नाही. यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर केव्हा रिलीज होणार असा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. खरे तर हा चित्रपट एक डिसेंबर 2023 ला बॉक्स ऑफिसवर रिलीज करण्यात आला.

सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला अल्प कालावधीतच चांगली पसंती मिळाली. या चित्रपटातील गाणे सुपरहिट झालेत. हा चित्रपट रिलीज होऊन आता एका महिन्यापेक्षा अधिकचा कालावधीचा उलटला आहे. मात्र अजूनही या चित्रपटाची सिनेमागृहात चलती आहे.

हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात मोठी गर्दी होत आहे. अशातच आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील लवकरच रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ज्या लोकांना सिनेमागृहात हा चित्रपट पाहता आला नाही त्यांना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे.

शिवाय ओ टी टी प्लॅटफॉर्मवर अनकट चित्रपट पाहता येणार असल्याने अनेकांच्या माध्यमातून ओटीटीवर हा चित्रपट केव्हा रिलीज होणार याची वाट पाहिली जात आहे. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट मध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच रिलीज होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट 26 जानेवारी 2024 ला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या ट्रेंड्सनुसार सिनेमागृहात चित्रपट रिलीज झाल्यानंतर 45 ते 60 दिवसात चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जातो.

त्यामुळे हा चित्रपट 26 जानेवारी पर्यंत नेटफ्लिक्स वर रिलीज होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात 580.84 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तसेच जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत 882.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts