मनोरंजन

शेवटी निर्णय झालाच, ‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार रणवीर-रश्मिकाचा ॲनिमल चित्रपट, कुठं पाहता येणार ?

OTT Animal Movie : गेल्या काही दिवसांपासून ॲनिमल चित्रपटाची खूप चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर समीक्षकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा चित्रपट समाजात चुकीचा संदेश देणारा असल्याचे म्हटले आहे तर काही लोकांनी या चित्रपटाचे तोंड भरून कौतुक देखील केले आहे.

दरम्यान बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर करत आहे. या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. दरम्यान काही लोकांना हा चित्रपट प्रत्यक्ष सिनेमागृहात जाऊन पाहता आलेला नाही. तर काही लोकांना या चित्रपटाचे अनकट सीन पाहायचे आहेत.

यामुळे अनेकांच्या माध्यमातून हा चित्रपट ओटीटीवर केव्हा रिलीज होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान रणवीर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खरे तर हा चित्रपट एक डिसेंबर 2023 ला सिनेमागृहात रिलीज झाला. तेव्हापासून या चित्रपटाच्या फारच चर्चा पाहायला मिळत आहेत. अजूनही या चित्रपटाची क्रेज कायमच आहे.

हा ॲक्शन-क्राईम-ड्रामा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. या चित्रपटातील कथा, यामधील गीत हे प्रेक्षकांच्या पसंतीस खरी उतरली आहेत. विकिपीडियाच्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई करण्यात यश मिळवले आहे.

एकंदरीत या भारतीय चित्रपटाचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी हे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

दरम्यान याच चित्रपटासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. आता या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट फायनल झाली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 26 जानेवारी 2024 ला रिलीज केला जाईल असा दावा ई टाइम्सने केला आहे.

अलीकडेच, एका मुलाखतीत संदीप रेड्डी वांगा यांनी खुलासा केला होता की, त्यांच्याकडे अ‍ॅनिमलचा विस्तारित कट आहे, जो तो OTT वर रिलीज करण्याचा विचार करत आहेत. यानुसार हा चित्रपट 26 जानेवारीला ओटीटीवर येण्याची दाट शक्यता आहे.

विशेष म्हणजे सिनेमागृहात हा चित्रपट तीन तास आणि 21 मिनिटांचा होता मात्र ओटीटीवर हा चित्रपट तीन तास आणि 29 मिनिटांचा राहणार आहे. यामुळे आता ओटीटीवर या चित्रपटातील तब्बल आठ मिनिटांचे अनकट सीन पाहायला मिळणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts