रकुल प्रीत सिंग ही एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आहे. तिचा अभिनय, ग्लॅमरस आदींचे अनेक चाहते आहेत. ती केवळ चित्रपट आणि मालिकांमध्येच नाही तर इतर अनेक व्यवसायांमध्ये देखील कार्यरत आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी तिने मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.
आता ती आपल्या भावासोबत बिझनेस करत आहे, ज्यामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे. कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर कोणीही आपलं ध्येय गाठू शकतं, याच उदाहरण म्हणजे रकुल प्रीत सिंग आहे.
ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केल्यानंतर रकुल प्रीत सिंगने कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
2009 मध्ये ‘गिल्ली’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. काही वर्षांनंतर तिने बॉलिवूडमध्येही आपल्या करिअरला सुरुवात केली, रकुलने अनेक वर्षांच्या संघर्षानंतर यश मिळवले आहे.
रकुल प्रीत सिंहने 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारिया’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. रकुलची खास गोष्ट म्हणजे ती केवळ चित्रपटच नव्हे तर आपल्या साईड बिझनेसच्या माध्यमातूनही कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.
रकुल प्रीत सिंग साइड बिझनेसमधून कमावते कोट्यवधी रुपये :- रकुल प्रीत सिंगचा व्यवसाय जिमच्या क्षेत्रात आहे. जिमचे नाव F45 ट्रेनिंग असे आहे. रकुलची दोन F45 ट्रेनिंग जिम आहेत, एक हैदराबादमध्ये आणि दुसरी विशाखापट्टणममध्ये. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. अभिनेत्रीने तिचा भाऊ अमन प्रीत सिंगसोबत ‘स्टारिंग यू’ नावाचे अॅपही लाँच केले आहे. दोघांनी मिळून 2021 मध्ये हा नवा व्यवसाय सुरू केला. याशिवाय अमन प्रीत सिंगही ‘रामराज्य’मध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज आहे. रकुल प्रीत सिंहची मुख्य कमाई चित्रपट आणि जाहिरातींमधून होते. रकुल दर महिन्याला अनेक ब्रँडची जाहिरात करते. या कामातून त्यांना 50 लाख रुपये मिळतात.
रकुल प्रीत सिंगचे प्रसिद्ध चित्रपट :- रकुल प्रीतने लॉकयम (2014), करंट थेगा (2014), नन्नाकू प्रेमाथो, सरायनोडू आणि ध्रुव (2016) सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. रकुल प्रीतने नन्नाकू प्रेमाथो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (तेलुगू) पहिला SIIMA पुरस्कार जिंकला. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या अटॅक: पार्ट वन, रनवे 34, कटपुतल्ली, डॉक्टर जी आणि थँक गॉड यांमध्ये देखील ती होती. तिच्या 2023 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात छत्रीवाली, मेरी पत्नी चा रिमेक आणि इंडियन 2 चा समावेश आहे.
रकुल प्रीत सिंगचा बॉयफ्रेंड :- रकुल प्रीत सिंगच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती अभिनेता-निर्माता जॅकी भगनानीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ती हैदराबादमध्ये राहते आणि मुंबईत तिचे स्वतःचे अपार्टमेंट देखील आहे. सध्याला अभिनेत्रीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफची सगळीकडे चर्चा होत आहे.