मनोरंजन

सिनेमा थिएटरबाहेर शेंगदाणे विकले, हाल अपेष्टा सहन केल्या नंतर बनला प्रसिद्ध अभिनेता! वाचा ‘या’ अभिनेत्याचा प्रवास

समाजामधील अनेक क्षेत्रातील यशस्वी लोक आपण पाहतो आणि अशा लोकांचे यश आपल्याला दिसते. परंतु या यशामागे जर आपण त्यांचे कष्ट किंवा संघर्षाची वाट पाहिली तर अंगावर शहारे येतात. अनेक व्यक्तींना उद्योग व्यवसाय देखील वडिलोपार्जित किंवा वडिलांकडून सहज मिळतात. परंतु असे व्यवसाय किंवा उद्योग विस्तारण्याकरता देखील प्रचंड प्रमाणात मेहनत आणि संघर्ष हा करावाच लागतो.

यशासाठी परिस्थितीशी झगडण्यात किंवा परिस्थितीशी दोन हात करण्याशिवाय पर्याय नसतो हे मात्र नक्की. राजकीय किंवा सामाजिक तसेच कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींचे जर आपण पूर्व आयुष्य पाहिले तर ते अनेक प्रकारच्या संघर्षांनी ठासून भरलेले आहे. परंतु या परिस्थितीला न घाबरता कठीण परिस्थितीशी संघर्ष करत अशा व्यक्तीने यश मिळवलेले असते.

अगदी याच पद्धतीने जर आपण प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा विचार केला तर आज बॉलीवूडमधील त्यांचे स्थान पाहिले तर माणसाला हेवा वाटेल असे आहे. परंतु त्यांचे पूर्व आयुष्य जर पाहिले तर ते अशा पद्धतीने होते की माणसाचा विश्वासच बसणार नाही. एवढ्या मोठ्या  विपरीत परिस्थितीशी दोन हात करत या व्यक्तीने बरेच काळ बॉलिवूडवर राज केले आणि आजही आहे.

 प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा जीवन प्रवास

जग्गू दादा या नावाने ओळखले जाणारे जॅकी श्रॉफ यांचे आयुष्य पाहिले तर ते एका चाळीतून त्यांच्या आयुष्याचे सुरुवात झाली व आयुष्याचे तब्बल तीस वर्षे या चाळीमध्ये त्यांनी पार केली. आर्थिक अडचणीत असलेले जाकी यांचे कुटुंब आता मात्र कोट्यावधी रुपये संपत्तीचे मालक आहेत. जेव्हा जॅकी श्रॉफ हे चाळीमध्ये राहायचे तेव्हा त्यांचे आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती व त्यांना उदरनिर्वाह करिता सिनेमा थिएटरच्या बाहेर शेंगदाणे विकायचे काम देखील करावे लागले तसेच कधीकधी ते सिनेमांची पोस्टर्स चिकटवायचे काम देखील करायचे.

परंतु अशा पद्धतीने काम करत असताना ते बॉलीवूडचे सुपरस्टार होतील हे त्यांनी कधी स्वप्नात देखील पाहिले नसेल. ज्या सिनेमा थेटरांच्या बाहेर त्यांनी इतर सिनेमांचे पोस्टर लावले त्याच सिनेमा थिएटरच्या बाहेर त्यांच्या सिनेमांचे पोस्टर लागेल हे त्यांना कधीच वाटले नव्हते. परंतु जॅकी श्रॉफ बॉलीवूड अभिनेते कसे बनले याची कहाणी पाहिली तर ती खूप प्रेरणादायक अशी आहे.

 जॅकी श्रॉफ अशा पद्धतीने आले बॉलीवूडमध्ये

जॅकी श्रॉफ यांच्या वडिलांचे नाव काकू भाई श्रॉफ असे होते व ते ज्योतिषी होते व त्यांच्या आईचे नाव रिटा होते व त्या कजाकिस्तानच्या रहिवासी होत्या. जॅकी श्रॉफ यांच्या आई वडिलांच्या लग्नाची कहाणी पाहिली तर ती देखील विशेष आहे. जॅकी श्रॉफ यांच्या आई रिटा या कझाकिस्थानच्या रहिवासी होत्या व कझाकिस्तान मधून लाहोरला पळून आल्या होत्या. परंतु कालांतराने त्या ठिकाणी सत्ता बदलली व भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली व त्यावेळी त्या मुंबईमध्ये आल्या व त्यांची भेट जॅकी श्रॉफ यांचे वडील काकूभाई श्रॉफ यांच्याशी झाली.

काकूभाई हे चाळीत राहायला येण्याच्या अगोदर खूप श्रीमंत होते. ज्योतिषी असल्या सोबतच शेअर मार्केट मधील ते एक नामांकित शेअर होल्डर देखील होते. परंतु नियतीचा फेरा फिरला आणि शेअर मार्केटमध्ये त्यांनी गुंतवलेले सारे पैसे बुडाले आणि संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर आले. त्यानंतर काकू भाईंना तीन बत्ती चाळीमध्ये राहावे लागले व त्याच ठिकाणी त्यांची व रिटा यांची भेट झाली.

नंतर त्यांनी लग्न केले व लग्नानंतर या दांपत्याला दोन मुलं झाली त्यातील लहान मुलाचे नाव जॅकी होते. जॅकी यांनी तीनबत्ती चाळीमध्ये अनेक वर्ष घालवली व कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा याकरिता त्यांनी शेंगदाणे विकले कधी चित्रपटात गृहाबाहेर पोस्टर चिकटवण्याचे काम देखील केले व या कामामधून त्यांना जे काही पैसे मिळायचे यातून त्यांच्या घराचा उदरनिर्वाह व्हायचा. जॅकी श्रॉफ यांचे शिक्षण फक्त अकरावी पर्यंत झाले असून आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण करता आले नाही.

 मॉडलिंगमध्ये एन्ट्री

कालांतराने त्यांनी घराची सगळी जबाबदारी उचलली व एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये काम करायला सुरुवात केली. एके दिवशी ते बस स्टैंड वर उभे होते व एका व्यक्तीने त्यांना त्यांचे फोटो काढण्याचा सल्ला दिला व यासाठी तुला पैसे मिळतील असे सांगितले. यामुळे जॅकी श्रॉफ यांना खूप आनंद झाला.

त्यांचे ते फोटो एका जाहिरात एजन्सीने घेतले होते व एका रात्रीत पैशांसाठी झगडणारा हा तरुण मॉडेल बनला व अशा पद्धतीने त्यांनी मॉडलिंग विश्वात पाऊल ठेवले. मॉडलिंगमधील पहिल्या कामासाठी त्यांना सात हजार रुपये मानधन मिळाले. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांनी पूर्णपणे मॉडेलिंग वर लक्ष केंद्रित केले व त्या माध्यमातून त्यांना चांगली आर्थिक प्राप्ती देखील व्हायला लागली.

त्यानंतर सुनील आनंद यांनी देवानंद यांच्याशी जाकी श्रॉफ यांची ओळख करून दिली. जेव्हा देवानंद जॅकी श्रॉफ यांना भेटले तेव्हा ते खूप प्रभावीत झाले व त्यांनी जॅकी श्रॉफ यांना चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका दिली व अशा प्रकारे या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री बॉलीवूड मध्ये झाली. त्यानंतर मात्र जॅकी श्रॉफ यांनी अनेक हिट सिनेमे बॉलीवूडला दिले व परत मागे फिरून पाहिले नाही.

Ajay Patil

Recent Posts