मनोरंजन

SRK Bad Habits : काय सांगता! शाहरुख खानला आहेत या ६ वाईट सवयी, ज्या त्याला एकट्याने करायला आवडतात

SRK Bad Habits : बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रसिद्ध नाव म्हणून अभिनेता शाहरुख खानच्या नावाला ओळखले जाते. तसेच शाहरुख खानच्या बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुख खानाने त्याची एकूण ३१ वर्षे चित्रपट सृष्टीमध्ये काम केले आहे.

चित्रपट सुष्टीमध्ये शाहरुख खानची ३१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याने ट्विटरवर एक #AskSRK सत्र ठेवले होते. यामध्येच त्याच्या एका चाहत्याने त्याच्याकडे एक इच्छा व्यक्त केली होती. शाहरुख खानसोबत सिगारेट ओढण्याची इच्छा त्याच्या एका चाहत्याने व्यक्त केली होती. त्यावर शाहरुख खानने ‘माझ्या वाईट सवयी मी एकटाच करतो’ असे उत्तर दिले आहे.

शाहरुख खानच्या वाईट आणि अस्वस्थ सवयी

1. शाहरुख दिवसाला 100 सिगारेट ओढत असे

शाहरुख खानच्या काही सवयींबद्दल तुम्हाला माहिती असेल मात्र त्याच्या आशा काही सवयी आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. शाहरुख खानला धूम्रपान करायची फार सवय आहे. तसेच तो खूप मोठ्या प्रमाणात धूम्रपानाचे सेवन करतो.

शाहरुख खान एका दिवसामध्ये तब्बल १०० सिगारेट ओढायचा. याबद्दल त्याने एका मुलाखतीमध्ये बोलताना खुलासा केला होता. शाहरुखने वयाच्या पन्नाशीनंतर सिगारेट सोडणार असल्याचे आश्वासनही दिले होते. मात्र अजूनही शाहरुख खानची सिगारेट ओढण्याची सवय गेलेली नाही.

2. 30 कप ब्लॅक कॉफी

शाहरुख खानला दररोज ब्लॅक कॉफी पिण्याची मोठ्या प्रमाणात सवय आहे. त्याची ही सवय देखील वाईट सवयींपैकी एक मानली जाते. एका दिवसामध्ये तो ३० कप कॉफी पितो. कॉफी पिण्याच्या नादामध्ये तो पाणी पिण्याचे देखील विसरतो असे देखील सांगण्यात येते.

3. नाश्ता न करणे

सकाळी उठल्याबरोबर अनेकांना नाश्ता करण्याची सवय असते. तसेच अनेकनाचा दिवस नाश्ता केल्याशिवाय सुरु होत नाही. मात्र शाहरुख खान कधीही नाश्ता करत नाही. त्याला सकाळी नाश्ता करण्याची आवड नाही.

4. शाहरुख बाथरूममध्ये तासनतास घालवतो

शाहरुखच्या या सवयीमुळे त्याची पत्नी गौरी खान स्वतः त्रासली आहे. तो म्हणाला की शाहरुख तासन् तास बाथरूममध्ये घालवतो. ते तिथे टीव्ही पाहतात किंवा इतर मनोरंजन उपक्रम करतात. शाहरुखची ही सवय तिला बदलायची आहे, असे गौरीने कॉफी विथ करणमध्ये सांगितले होते.

5. शाहरुख पुरेशी झोप घेत नाही

शाहरुख खान पुरेशी झोप घेत नसल्याचे देखील बोलले जाते. तसेच त्याला रात्रभर जागण्याची सवय आहे. तसेच जर त्याला झोप हवी असेल तर काही वेळापुरतीच तो झोप घेतो असे देखील बोलले जाते.

6. गेमिंग हे एक वाईट व्यसन आहे

किंग खानला गेमिंगचे मोठे व्यसन जडले आहे. मन्नतच्या आलिशान घराचा संपूर्ण मजला गेमिंगसाठी बनवण्यात आला आहे. शारुख खान गेम खेळण्यासाठी तासंतास घालवतो. तसेच शाहरुख खान दररोज गेम खेळतो असे देखील सांगण्यात येते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts