Border 2 : सनी देओल असा अभिनेता आहे की ज्याने 90 च्या दशकात हॉलिवूड वर राज्य केले. त्याचे असंख्य चाहते आहेत. परंतु इतकी दशके मध्ये जाऊनही व अनेक नवीन अभिनेते इंडस्ट्रीमध्ये असूनही सनी देओल प्रचंड फेमस आहे.
त्याचीच क्रेझ अजूनही कमी झाली नाही. नुकताच येऊन गेलेला गदर 2 ने तर प्रचंड यश कमावले. त्याच्या यशानंतर सनी देओल सध्या यशाचं शिखरावर आहे. त्याच्याकडे अनेक फिल्म आल्या आहेत.गदर 2 नेजवळपास 500 कोटींची कमाई केली. आता सनी देओल बॉर्डर 2 मध्ये दिसणार आहे.
1997 मध्ये आलेल्या या फिल्म ने जबरदस्त यश मिळवलं होत. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान अशी फोडणी असलेला सिनेमा येणार असल्याने तो देखील प्रचंड चालेल अशी अशा आहे. त्यामुळे या सिनेमासाठी सनी देओल ने प्रचंड फी घेतले असल्याची माहिती आहे.
* सनी देओलने आकारली भरमसाठ फी
एका ताज्या रिपोर्ट नुसार, सनी देओलने 1997 मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाच्या सिक्वेलसाठी साइन अप केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओलने ‘बॉर्डर 2’साठी 50 कोटी रुपये घेतले आहेत. या शुल्काबरोबरच मिळणाऱ्या नफ्यामधेही उत्पादकांशी काही हिस्सा मागितला आहे. दरम्यान बॉर्डर 2 साठी सनी देओल च्या या फी बद्दल फक्त रिपोर्ट्स आले आहेत. निर्माते किंवा अभिनेत्याकडून अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही.
* बॉर्डर 2 चे शूटिंग कधी सुरू होणार?
काही रिपोर्टनुसार, बॉर्डर 2 हा एक मोठा चित्रपट असणार आहे. ज्याचे शूटिंग पुढील वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजेच 2024 मध्ये सुरू होईल. सनी देओलशिवाय या चित्रपटात अनेक कलाकार दिसणार असल्याचेही बोलले जात आहे.
1997 मध्ये रिलीज झालेला बॉर्डर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेपी दत्ता यांनी केले होते. बॉर्डरमध्ये सनी देओलशिवाय सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, पूजा भट्ट, तब्बू यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते.
* पुन्हा जादू दिसणार ?
सनी देओल गदर 2 मधून सर्वांसमोर आला. विशेष म्हणजे चाहत्यांनीही हा सिनेमा डोक्यावर घेतला. करोडो रुपये या सिनेमाने कमवले. आता त्याचे आगामी काही सिनेमे येत हायेत. या सिनेमामध्ये सनई देओल पुन्हा हीच जादू दाखवू शकतो अशी निर्मात्यांना आशा आहे. त्यातील काही सिनेमे खूपच हिट होतील असे आधीच भाकीत केले जात आहे. त्यामुळे आता सनी देओलची जादू पुन्हा बॉक्स ऑफिसवर चालणार का हे आगामी काळच सांगेल.