Upcoming Cars : कार चाहत्यांना खुश करणाऱ्या तसेच भारतात वर्षानुवर्षे चर्चेत असणाऱ्या काही कार आहेत. मात्र कारणास्तव त्या बंद झाल्या होत्या. परंतु आता पुन्हा या कार बाजारात येणार आहेत.
अशा कारच्या यादीत हिंदुस्तान अॅम्बेसेडर, टाटा सिएरा, हिंदुस्तान कॉन्टेसा, मारुती 800, मारुती ओम्नी, मारुती जिप्सी या नावांचा समावेश आहे. ही सर्व वाहने सध्या भारतात विकली जात नाहीत.
पण चांगली गोष्ट म्हणजे यापैकी तीन कार भारतात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहेत. विशेष म्हणजे यातील एका गाडीचे बुकिंगही सुरू झाले आहे.
Hindustan Ambassador
एकेकाळी भारतीय रस्त्यांचा राजा मानल्या जाणाऱ्या या कौटुंबिक सेडानचा वापर सामान्य लोक VIP लोकांसाठी करत असत. आताही ही गाडी अनेक राजकारणी आणि प्रशासनातील लोकांकडे बघायला मिळते.
1956 ते 2014 या काळात त्याची विक्री झाली. अशी अफवा आहे की ही कार लवकरच भारतात कमबॅक करणार आहे. यावेळी अॅम्बेसेडरला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये आणण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
Tata Sierra
यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला टाटा सिएरा ही कार येते. टाटा सिएरा ही भारतातील पहिली SUV होती आणि ती 1991 मध्ये लाँच झाली होती. पूर्वी ते फक्त ऑफ-रोडिंगसाठी आणले जात होते. 2003 मध्ये कंपनीने ते बंद केले होते.
आता टाटा मोटर्सने ते पुन्हा इलेक्ट्रिक अवतारात आणले आहे. गेल्या महिन्यात हे ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करण्यात आले होते आणि लवकरच बाजारात लॉन्च केले जाईल. टाटा सिएरा इलेक्ट्रिकमध्ये 40.5kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो, जो 437 किमीची रेंज देईल.
Maruti Gypsy
दरम्यान या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाला मारुती जिप्सी आहे. मात्र कंपनीने आता या कारचे नाव बदलून कंपनीने मारुती जिमनी भारतात आणली आहे. या एसयूव्हीचे बुकिंग आधीच सुरू झाले असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मारुतीची ही पहिली 4X4 कार असेल. ही कार भारतात बनवून परदेशात विकले जाईल. यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. तसेच महिंद्रा थारला टक्कर देणाऱ्या या कारला 5 दरवाजे आहेत.