Ahmednagar News :- पडवीत झोपलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पठार भागातील कुरकुटवाडी येथे काल गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली.
सचिन भानुदास कुरकुटे (वय २२) असे बिबट्याच्या हल्ल्यात येथील मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. सचिन आपल्या भावासोबत ‘पडवीमध्ये झोपलेला होता.
१२ वाजेच्या सुमारास सचिनवर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच सचिनचा भाऊ हरीश याने आरडाओरडा केला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सचिन रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. बिबट्याने हल्ला केल्याचे त्याच्या मोठ्या भावाने सांगितले.
गळ्याला आणि कपाळावर झालेल्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सचिनला उपचारासाठी आळेफाटा खासगी रुग्णालयात नेण्यात आले;
मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रात्री डॉक्टरांनी सांगितले.पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.
प्राथमिक तपासात मयत तरुणाच्या गळ्याला झालेली जखम बरीच त्याच्या आवाजाने खोल असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसत होते.