अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपकडून खा. सुजय विखे हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार दिला नसला तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून येथे आ. निलेश लंके यांना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे.
परंतु आजवर निलेश लंके यांच्या प्रवेशाच्या चर्चा झाल्या परंतु अद्याप प्रवेश मात्र झालेला नाही. परंतु आज त्यांच्या एका कृतीने मात्र त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाच्या चर्चेला मात्र ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
अहमदनगर मधील राष्ट्रवादी भवन मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज (दि.२३ मार्च) बैठक पार पडली. या बैठकीला आ. निलेश लंके हे उपस्थित होते. त्यामुळे आता आ. निलेश यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला पुष्टी मिळाली असल्याची चर्चा आहे.
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाची आज (दि.२३ मार्च) बैठक होती. लोकसभेच्या अनुशंघाने ही बैठक असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीला आ. प्राजक्त तनपुरे, माजी आ. दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी या बैठकीला आ. निलेश लंके यांनी हजेरी लावल्याने त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाला पुष्टी मिळत आहे. आजपर्यंत निलेश लंके यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नव्हती परंतु आता ही उपस्थिती सर्वकाही सांगून जाते अशी चर्चा नागरिकांत आहे.