Ahmednagar Politics : खा.सुजय विखे यांना अहमदनगरमधील एका गावात नागरिकांच्या संतप्त भावनांना सामोरे जावे लागले. याबाबत व्हिडीओ देखील सोशल मीडियात फिरत आहे.
खासदार म्हणून तुम्ही 5 वर्षांत काय केलेत? असा सवाल करत आम्हाला आधी पाणी द्या मगच गावात या असे या लोंकानी सुनावले असे या व्हिडिओत दिसत आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी आमदार मोनिका राजळे या देखील उपस्थित होत्या व त्या देखील नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या असे यात दिसत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात खासदार सुजय विखे हे साखर वाटप कार्यक्रम मागील काही दिवसांपासून करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ते शेवगाव तालुक्यातील भालगाव येथे आले होते. या कार्यक्रमावेळी सुजय विखे पाटील हे भाषणाला उभे राहिले व बोलणार इतक्यात लोक संतप्त झालेले दिसतात.
सुजय विखे यांच्यावर गावकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्याचे दिसते. तुम्ही बोलू नका त्याआधी तुम्हीदिलेला शब्द पाळा, जेव्हा मी पाणी देईल तेव्हाच या गावात येईन असा तुमचा शब्द असून पाच वर्षे झाले तुम्ही पाणी का दिलं नाही असा सवाल यावेळी ग्रामस्थ करत आहेत.
पुढे लोक म्हणत आहेत की, आम्हाला तुमची साखर नको तर सरकारी योजना पाहिजेत. आम्हाला याठिकाणी पाणी पाहिजे ते द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली दिसते.
लोकांनी खडसावयाला सुरवात केल्यानंतर खा. सुजय विखे आमदार मोनिका राजळे यांनी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु लोक गोंधळ घालतच होते असे यात दिसत आहे.
यावेळी सुजय विखे पाटील यांनी पाणी योजना महाविकास आघाडीमुळे थांबली होती असा दावा देखील केला परंतु ग्रामस्थांना त्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता असे या व्हिडिओत दिसत आहे.