Best Business Idea: सध्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा असेल तर ती नोकरी मिळवण्याच्या बाबतीत दिसून येते. अगदी 100 रिक्त जागांसाठी जरी भरती निघाली तरी त्याकरिता चार ते पाच हजार अर्ज दाखल होतात. तसेच अगदी शिपाई पदाच्या जागांसाठी देखील अनेक क्षेत्रातले पदवीधर तसेच पोस्ट ग्रॅज्युएट झालेले तरुण-तरुणी देखील अर्ज करतात.
यावरून सध्याचे नोकरीचे चित्र काय आहे याचा अंदाज लावता येतो. त्यामुळे आता नोकरीच्या मागे न लागता काहीतरी व्यवसाय करणे खूप फायद्याचे ठरत आहे. परंतु व्यवसाय करताना देखील मनामध्ये गोंधळ उडतो. यामध्ये व्यवसाय करावा तर नेमका कोणता करावा? हा सगळ्यात आधी प्रश्न उद्भवतो.
व्यवसाय कोणता करावा याची निश्चिती झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे लागणारे भांडवल हा होय. जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर अनेक छोटे मोठे व्यवसाय कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात. परंतु व्यवसायाची निवड करताना गुंतवणुकीला जितके महत्त्व आहे तितकं त्या व्यवसायातून मिळणारा आर्थिक परतावा किंवा त्या व्यवसायाला बाजारात असणारी मागणी देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण या लेखांमध्ये कधीही बंद न पडणारा व कायम मागणी असणाऱ्या एका व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत जो खूप फायद्याचा ठरू शकतो.
साबण तयार करण्याचा व्यवसाय ठरेल फायद्याचा
साबणाचा विचार केला तर प्रत्येक दिवशी लागणारी वस्तू असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साबण येतात. कमीत कमी गुंतवणूक करून तुम्ही घरी बसून हा व्यवसाय सुरू करू शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला 80% पर्यंत कर्ज सुविधा देखील मिळू शकते. यामध्ये अर्थातच तुम्हाला बँकेच्या महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे गरजेचे असते. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेकडून किंवा सरकारकडून कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होत नाही. साबणाचा जर बाजारपेठेचा विचार केला तर अगदी लहान बाळापासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत साबणाचा वापर होत असतो. त्यामुळे हा व्यवसाय कधीही न बंद पडणारा व्यवसाय असून तो चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे.
किती कर्ज मिळू शकते?
हा उद्योग उभा करण्यासाठी किंवा साबनाचा कारखाना टाकण्याकरिता तुम्हाला पंधरा लाखाच्या आसपास खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच तीन महिन्याचे तुमचे वर्किंग कॅपिटल, यंत्रसामग्री अशा गोष्टींचा विचार केला तर पंधरा लाख रुपये ही रक्कम तुम्हाला लागू शकते. परंतु यामध्ये तुम्हाला वीस टक्के रक्कम स्वतः गुंतवावी लागेल व उरलेली 80 टक्के रक्कम तुम्ही बँकेच्या माध्यमातून किंवा मुद्रा योजनेअंतर्गत मिळवू शकतात.
किती नफा मिळू शकतो?
तुम्ही केंद्र सरकारच्या पंतप्रधान मुद्रा योजनेचा फायदा घेत हा उद्योग सुरू केला व एका वर्षाला चार लाख किलो साबण उत्पादित करून त्यांची विक्री केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पन्नास हजार रुपयांचा नफा मिळवता येणे शक्य आहे. तुम्ही जर वर्षाला चार लाख किलो साबणाचे उत्पादन घेतले तर तुम्हाला 47 लाखांचा नफा यामधून मिळू शकतो. यामध्ये कर्जाचे हप्ते व इतर खर्च वजा केल्यावर प्रत्येक महिन्याला तुम्हाला पन्नास हजार रुपयांचा नफा राहू शकतो.
हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी
तुम्हाला जर साबण बनवायचा असेल तर तो वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवता येऊ शकतो. यामध्ये सुगंधी साबण तसेच कपडे धुण्याचा, भांड्यांकरता लागणारा तसेच औषधी असे अनेक साबणाचे प्रकार आहेत. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या श्रेणीचे साबण तयार करून तुमच्या व्यवसायामध्ये नाविन्यपणा आणू शकतात. साबणाचे उत्पादन घेताना असलेली मागणी आणि बाजारभाव या गोष्टी समोर ठेवून व्यवसाय केला तर या माध्यमातून भरपूर नफा मिळू शकतो.