Radhakrishna Vikhe Patil : मराठा आंदोलक पेटलेले असतानाच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे.राज्यात आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण, सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. शंकर बंगाळे असे या धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात थांबले असताना आज सकाळी त्यांना भेटण्यासाठी धनगर कृती समितीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आल्याची माहिती त्यांना कार्यकर्त्यांनी दिली. त्यांनी संबंधित शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलं.
विखे पाटील आल्याची कुणकुण लागताच धनगर समाजातील आंदोलकांनी रेस्ट हाऊसकडे धाव घेतली. मंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे. आम्हाला त्यांची भेट हवीय असं आंदोलकांनी पोलिसांना सांगितलं.
पोलिसांनीही त्यांचं म्हणणं विखे पाटील यांच्याकडे पोहोचवलं. तेव्हा विखे पाटील यांनी आंदोलकांना येण्याची परवानगी दिली. आम्ही जनतेचे प्रश्नच सोडवण्यासाठी बसलो आहोत, असं सांगत विखे पाटील यांनी धनगर समाजातील कार्यकर्त्यांना बोलावलं.
हे कार्यकर्ते रेस्ट हाऊसमध्ये आले. कार्यकर्ते येताच विखे पाटील ऊठून उभे राहिले. त्यांना नमस्कार केला. आणि तुमचं काय म्हणणं आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी धनगर समाजातील आंदोलक शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांना निवेदन दिलं.
यावेळी बंगाळे नामक धनगर आरक्षण कृती समितीचा पदाधिकारी एक निवेदन घेऊन तिथे दाखल झाला. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्याने निवेदनही दिलं. मात्र, विखे पाटील हे निवेदन वाचत असताना त्यानं खिशातून एक पुडी काढून त्यातला भंडारा विखे पाटलांच्या डोक्यावर ओतला.त्यामुळे विखे पाटील यांच्या अंगावर संपूर्ण हळद पसरली. या प्रकाराने विखे पाटील काहीसे गोंधळले.
झाला प्रकार सर्वांसाठीच अनपेक्षित असल्यामुळे काय घडलंय हे समजण्यासाठी मध्ये दोन क्षण गेले आणि विखे पाटलांच्या अंगरक्षकांनी बंगाळेची लगेच धरपकड करून त्याला चोप दिला. त्यात विखे पाटलांचे काही कार्यकर्तेही असल्याचं सांगितलं जातं. यानंतर पोलिसांनी बंगाळेला ताब्यात घेतलं असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
हा प्रकार घडताच तिथेच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली. बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
यावेळी विखे पाटील यांनी अरे सोडून द्या त्याला. मारू नका, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बंगाळे याला बाहेर ओढत नेलं.यावेळी शेखर बंगाळे यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
आम्ही आज भंडारा उधळला आहे. आमचा निषेध नोंदवला आहे. धनगर समाजाला अजूनही आरक्षण देण्यात आलेलं नाही. आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही. आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये, असं सांगतानाच आम्हाला आरक्षण नाही दिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बंगाळे यांनी दिला आहे.हा प्रकार घडताच तिथेच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली.
बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनी अरे सोडून द्या त्याला. मारू नका, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बंगाळे याला बाहेर ओढत नेलं.
धनगर आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धनगर आरक्षण कृती समितीने केला आहे.