Exclusive

कारल्याच्या ‘या’ जातीची लागवड करा; विक्रमी उत्पादन मिळणार !

Bitter Gourd Farming : अलीकडे शेतकरी बांधव पारंपारिक पिकांच्या शेती सोबतच भाजीपाला वर्गीय पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. तरकारी पिकांच्या शेतीमधून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे बारामाही पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी आता भाजीपाला पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. केवळ पारंपारिक पिकांच्या शेतीवर विसंबून राहण्याऐवजी पारंपारिक पिकांसोबतच भाजीपाला शेतीकडे शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा वळवला आहे.

यामध्ये कारले या पिकाची देखील राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. खरतर कारले पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. मात्र यासाठी कारल्याच्या सुधारित वाणाची लागवड करणे अपेक्षित आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना कारल्याच्या सुधारित वाणाची लागवड करण्याचा सल्ला देतात.

दरम्यान, आज आपण शेतकरी वाचक मित्रांसाठी कारल्याच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

हे पण वाचा :- खरीपात तुरीच्या ‘या’ वाणाची पेरणी करा; 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार !

कारल्याच्या सुधारित जाती

पुसा हायब्रीड १

पुसा हायब्रिड २

पुसा स्पेशल

अर्का हरित

ग्रीन लॉंग 

फैजाबाद स्मॉल 

जोनपुरी

झालरी

सुपर हार्वेस्टिंग

व्हाईट लॉंग 

ऑल सीजन

हितकरी

भाग्य सुरुची

मेघा-एफ१

वरुण-१ पूनम

तिजारावी

अमन क्रमांक-२४

नन्हा क्र. -13

हे पण वाचा :- मोठी बातमी ! नांदेडलाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा; कोणत्या मार्गावर धावणार? पहा….

अशी करा कारल्यांची लागवड

कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना वर्टीकल फार्मिंग तंत्रज्ञानाने कारल्याची शेती करण्याचा सल्ला देतात. खरं तर ही उच्च उत्‍पादनाची चांगली शेती प्रणाली मानली जाते.

या तंत्रज्ञानाच्या वापराने कारले पिकातून चांगले दर्जेदार उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता येते. या तंत्राद्वारे कारल्याची रोपे थेट वाढतात. या तंत्राचा उपयोग कारल्याच्या लागवडीतच नव्हे तर इतर फळे आणि भाजीपाल्यांच्या लागवडीसाठीही केला जाऊ शकतो.

निश्चितच, कारले पिकाच्या सुधारित जातींची या व्हर्टिकल फार्मिंग तंत्रज्ञानाने लागवड केल्यास शेतकरी बांधवांना अल्प कालावधीतच चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! यंदा विदर्भात होणार शंभर टक्के पाऊस; तुमच्या जिल्ह्यात कसा राहणार पाऊस? वाचा…..

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts