Business Idea:- कुठलाही व्यवसाय करणे हे नोकरी करण्यापेक्षा नक्कीच उत्तम असते यात शंकाच नाही. कारण दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणि त्या मानाने नोकऱ्यांची उपलब्धता यामध्ये प्रचंड असे अंतर आहे. त्यामुळे छोटे मोठे व्यवसाय करण्यात फायदा आहे. परंतु व्यवसाय करताना किंवा व्यवसायाचा विचार मनात आल्यानंतर सगळ्यात अगोदर मनात येते ते म्हणजे कोणता व्यवसाय करावा आणि त्यासाठी लागणारे भांडवल या बाबी प्रकर्षाने पुढे येतात.
परंतु व्यवसायाची निवड करताना भांडवलाची आवश्यकता तर असतेस परंतु संबंधित व्यवसायाला बाजारपेठेत किती मागणी आहे? याचा देखील अभ्यास होणे गरजेचे असते. जर आपण व्यवसायांचा विचार केला तर अनेक कमी गुंतवणुकीतल्या व्यवसायाची मोठी यादीच तयार होईल. परंतु मागणीच्या अनुषंगाने व्यवसाय उभारणे कधीही फायद्याचे ठरते. जास्त करून दैनंदिन वापरातल्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय हा बहुतांशी यशस्वी ठरतो. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये एका कमी गुंतवणूक असलेला व्यवसायाची माहिती घेणार आहोत.
टिकल्या किंवा बिंदी तयार करण्याचा व्यवसाय
महिला वर्गांमधील सगळ्यात महत्त्वाच्या असलेले टिकली किंवा बिंदी तयार करण्याचा व्यवसाय हा अगदी दहा हजार रुपयांपासून सुरू करता येणे शक्य आहे. कमीत कमी खर्चामध्ये चांगली मागणी असणारा हा व्यवसाय असून अगदी छोट्या यंत्राच्या साह्याने तुम्ही तुमच्या घरामधून या व्यवसायाला सुरुवात करू शकता. जर आपण प्राचीन काळाचा विचार केला तर टिकलीला विवाहित महिलांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे.
तसेच मुली देखील मोठ्या प्रमाणावर टिकल्यांचा वापर करतात. महिलांच्या सोळा शृंगार पैकी टिकली हा एक शृंगार असून याला खूप महत्त्व आहे. आता बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि आकाराच्या टिकल्या विक्रीकरिता येतात व त्या पद्धतीने महिला देखील त्यांचा वापर करतात. ग्रामीण भाग असो की शहरी भाग या प्रत्येक ठिकाणी या व्यवसायाला मागणी आहे.
टिकल्यांच्या बाजारपेठेचा आवाका
जर टिकल्यांच्या बाजारपेठेचा विचार केला तर ते आता खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारले असून एका आकडेवारीचा विचार केला तर एक महिला वर्षभरामध्ये 12 ते 14 टिकल्यांच्या पॅकेट वापरते. त्यामुळे या साहाय्याने तुम्ही या व्यवसायात पाऊल टाकणे गरजेचे आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे अगदी दहा हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करू शकतात.
या व्यवसायाकरता लागणारा कच्चामाल
कुठल्याही प्रकारचे उत्पादन तयार करण्याकरता त्याकरिता अगोदर कच्चामाल आवश्यक असतो. त्यामुळे टिकल्या तयार करण्यासाठी देखील काही कच्चामाल लागतो. यामध्ये प्रामुख्याने मलमल चे कापड, चिटकवण्याकरिता गम, डिंक तसेच क्रिस्टल आणि काही प्रकारच्या मोत्यांसारख्या कच्च्या मालाची आवश्यकता भासते. हा सगळा प्रकारचा कच्चा माल तुम्हाला स्थानिक बाजारपेठेमध्ये सहजरीत्या मिळू शकतो.
अशा पद्धतीने सुरू करू शकतात हा व्यवसाय
हा व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्हाला काही मशिनरीज लागते. यामध्ये टिकली तयार करण्याकरिता टिकली प्रिंटिंग मशीन, टिकली कटर मशीन आणि गमिंग मशीन इत्यादींचा समावेश होतो. यासोबतच मोटर आणि हॅन्ड टूल्स देखील लागतात. यामध्ये ऑटोमॅटिक मशीन देखील येतात परंतु तुम्ही अगदी सुरुवातीला मॅन्युअल मशीन चा वापर यामध्ये करू शकतात. जसा जसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल त्या पद्धतीने तुम्ही ऑटोमॅटिक मशीन खरेदी करू शकतात.
या व्यवसायाच्या आधारे मिळणारे आर्थिक उत्पन्नाचे स्वरूप
या व्यवसायामध्ये तुम्ही 50% पेक्षा जास्त बचत करू शकतात. जर तुमचे उत्पादनाची विक्री चांगल्या पद्धतीने होत असेल व तुम्ही प्रत्येक महिन्याला पन्नास हजार रुपयांपर्यंत देखील कमाई या माध्यमातून करू शकतात. तुमचा व्यवसायात वाढ करण्यासाठी मार्केटिंग महत्त्वाचे असून याकरिता तुम्ही तुमच्या भागातील कॉस्मेटिकच्या दुकानांना भेट देऊन तुमची विक्री वाढवू शकतात किंवा जनरल स्टोअरमध्ये देखील तयार माल विकू शकतात.
तसेच तुमच्या उत्पादनाच्या विक्रीकरिता तुम्ही सुपर मार्केट किंवा मॉल तसेच बाजारातील किंवा मंदिराच्या आसपास असलेल्या छोट्या दुकानांमध्ये देखील तयार टिकल्यांचा पुरवठा करून चांगला नफा मिळवू शकतात. त्यामुळे कमीत कमी गुंतवणुकीत जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.