Cibil Score : जर तुम्हीही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. खरं पाहता भारतात कर्ज घेण्यासाठी चांगला सिबिल स्कोर असणे आवश्यक आहे. सिबिल स्कोर चांगला असला तर बँका कर्ज मंजूर करण्यास उत्सुक असतात.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सिबिल स्कोर हा व्यक्तीच्या कर्जाचा इतिहास दर्शवतो. म्हणजेच कर्ज परतफेडीच्या आधारावर प्रत्येक व्यक्तीचा सिबिल स्कोर तयार केला जातो. सिबिल स्कोर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड च्या माध्यमातून तयार होतो. हा स्कोर 300 ते 900 दरम्यान गणला जातो.
निश्चितच आपल्याला माहीतच असते की चांगला सिबिल स्कोर असला तर कर्ज लवकर मंजूर होत. पण एखाद्या व्यक्तीला कर्ज घ्यायचा आहे तर त्यासाठी किमान किती सिबिल स्कोर लागतो? अशा प्रश्नांची विचारणा नागरिकांकडून होते. दरम्यान आज आपण याच प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आजपासून सुरु होणार ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन, संपूर्ण रूट, थांबे, टायमिंगबाबत वाचा…
कर्ज घेण्यासाठी किती कि सिबिल स्कोर लागतो?
जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी, वाहन खरेदी करण्यासाठी किंवा महागडे इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा मग पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम बँका तुमचा सिबिल स्कोर तपासत असतात. सिबिल स्कोर चांगला असला तर बँका कर्ज लवकर मंजूर करतात.
जाणकार लोक सांगतात की सिबिल स्कोर हा 750 पेक्षा अधिक असल्यास बँका अशा व्यक्तींना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देतात. तसेच 700 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असलेल्या व्यक्तींना देखील बँका कर्ज देण्यास उत्सुक असतात.
मात्र सिबिल स्कोर हा कमी असला तर बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, अनेक प्रकरणात अशा व्यक्तींना कर्ज नामंजूर होतं तर काही प्रकरणात अधिक व्याज दरात कमी कर्जाची रक्कम मंजुर होते.
हे पण वाचा :- दहावी, बारावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! कोलफिल्डमध्ये 608 पदांच्या रिक्त जागासाठी मेगाभरती, आजच करा अर्ज
मात्र कर्ज मिळवण्यासाठी किती किमान सिबिल स्कोर लागतो याबाबत कोणीही स्पष्टपणे माहिती दिलेली नाही. एकंदरीत सिबिल स्कोर किती पाहिजे? हे अद्याप अस्पष्ट असले तरीदेखील 700 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असलेल्या व्यक्तींना लवकर आणि कमी व्याजदरात कर्ज मंजूर होतं हे आपण समजू शकतो.
काही तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 600 पेक्षा सिबिल स्कोर हा खूपच खराब सिबिल स्कोर म्हणून गणला जातो. यामुळे प्रत्येकाने सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यासाठी घेतलेले कर्ज योग्य वेळेत फेडणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर अदा करणे आवश्यक आहे. तसेच जर ईएमआय सुरू असेल तर ईएमआय हा वेळेवरच भरला गेला पाहिजे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ‘या’ तारखेला होणार उदघाट्न, कसा राहणार मार्ग? वाचा….