Exclusive

ब्रेकिंग : ‘या’ तारखेला पंतप्रधान मोदी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा बावटा, कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

CSMT-Madgaon Vande Bharat Train : मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या विशेषता कोकणवासीयांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे ती भारतीय रेल्वेच्या माध्यमातून.

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई आणि देशातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे गोवा या दोन शहरादरम्यान रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे.

विशेष म्हणजे मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. दरम्यान आता मुंबई ते गोवा या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भारतीय रेल्वे लवकरच एक मोठी भेट देणार आहे. या मार्गांवर देशातील पहिली हायस्पीड ट्रेन अर्थातच वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे.

विशेष म्हणजे याची ट्रायल रन आताच कम्प्लीट झाली असून या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी चेन्नई येथील कोच फॅक्टरी मधून नवा कोरा रेक मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाला आहे. अर्थातच उद्घाटनापूर्वी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

यामुळे या ट्रेनला केव्हा हिरवा बावटा दाखवला जाणार? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे? आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव रेल्वे स्थानकावर 3 जून 2023 रोजी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.

अर्थातच येत्या तीन दिवसात या मार्गावर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ट्रेनला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा बावटा दाखवतील अशी माहिती समोर आली आहे.

3 जूनला जरी या गाडीला हिरवा झंडा दाखवला जाणार असला तरी देखील प्रवाशांसाठी ही ट्रेन पाच जून 2023 पासून नियमितपणे सुरू केली जाणार आहे.

कसं असणार वेळापत्रक

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावच्या प्रवासात ही गाडी CSMT येथून सकाळी पाच वाजून 35 मिनिटांनी निघणार आहे. यानंतर ठाणे रेल्वे स्थानकावर सहा वाजून पाच मिनिटांनी पोहचेल, पनवेल रेल्वे स्थानकावर 6:40 ला पोहोचेल, खेड रेल्वे स्थानकावर 8 : 40ला पोहोचेल, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दहा वाजता पोहोचेल, सिंधुदुर्ग मधील कणकवली या रेल्वेस्थानकावर ही गाडी अकरा वाजून वीस मिनिटांनी पोहचेल आणि शेवटच्या स्थानकावर अर्थातच मडगाव रेल्वे स्थानकावर ही गाडी 1 वाजून 25 मिनिटांनी पोहोचणार आहे.

गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्रवासात ही गाडी मडगाव रेल्वे स्थानकावरून दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी सुटणार आहे, मग कणकवली रेल्वे स्थानकावर ही गाडी चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल, रत्नागिरी स्थानकावर पाच वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल, रोहा येथे 8 वाजून 5 मिनिटांनी आणि पनवेल येथे 9 वाजून 18 मिनिटांनी ही ट्रेन पोहोचणार आहे, रात्री साडेदहा वाजता ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचणार आहे.

Ajay Patil

Recent Posts