Dearness Allowance News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एका प्रतिष्ठित मिडिया रिपोर्ट मधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून आणखी चार टक्के वाढणार आहे.
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा आहे. यामध्ये आता आणखी चार टक्के वाढ होणार आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. परंतु याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र ही घोषणा येत्या काही दिवसात केली जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
महागाई भत्ता 46 टक्के करण्याची ही घोषणा सप्टेंबर महिन्यात होईल, म्हणजेच सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती एका विश्वस्त वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे. निश्चितच सप्टेंबर महिन्यात हा निर्णय घेण्यात आला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे.
दरम्यान आज आपण महागाई भत्ता 46 टक्के झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढणार? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र शासनाने मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा केली होती. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के बनला होता. आता हा महागाई भत्ता आणखी चार टक्के वाढ वाढणार आहे, म्हणजे 46% एवढा होणार आहे.
पगारात किती वाढ होणार?
आता आपण महागाई भत्ता 4% वाढल्यानंतर म्हणजेच महागाई भत्ता ४६ टक्के एवढा झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार याबाबत थोडक्यात समजून घेऊया. जर समजा एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 31,550 रुपये आहे. तर अशा कर्मचाऱ्याला 46% नुसार 14,513 रुपयाचा महागाई भत्ता मिळणार आहे.
सध्याच्या 42 टक्के नुसार या सदर कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 13,251 रुपये आहे. याचाच अर्थ महागाई भत्ता 46% झाला तर 31 हजार 550 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याच्या सध्याच्या पगारात दरमहा 1262 रुपये एवढी वाढ होणार आहे. अर्थातच सदर कर्मचाऱ्याला वार्षिक 15,144 रुपये पगार वाढीचा लाभ मिळणार आहे.