Deccan Odyssey Express:-जर आपण भारतातील शाही रेल्वेचा विचार केला तर त्यापैकी एक असणारी म्हणजे डेक्कन ओडिसी ट्रेन असून ती तब्बल कोरोना कालावधीनंतर तीन वर्षानंतर पुन्हा धावणार असून ही गाडी आता नव्या रूपामध्ये आणि नवीन ढंगांमध्ये सजवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन ओडिसीची सुरुवात 2005 मध्ये करण्यात आली होती परंतु मार्च 2020 मध्ये कोरोना कालावधी आणि लॉकडाऊन मुळे या रेल्वे गाडीची सेवा खंडित करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून या गाडीच्या अंतर्गत आणि बाह्य भागात अनेक बदल करण्यात आले व आता पर्यटकांसाठी कायमच आकर्षण राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 नव्या रूपामध्ये पुन्हा पर्यटकांच्या सेवेसाठी खुली करण्यात आलेली आहे.
आता ही नवीन नूतनीकरण करण्यात आलेली डेक्कन ओडिसी पर्यटना करिता आता महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातील इतर राज्यांमधील पर्यटन स्थळांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला असून यामध्ये गोवा, मुंबई तसेच बनारस, आग्रा, जयपूर ते सिलिगुडी यासारख्या विविध पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांचा आधार समावेश करण्यात आला आहे
डेक्कन ओडिसी पर्यटनासाठीचे आता नवीन मार्ग( वर्ष 2023-24 मधील सहलींचे आयोजन)
1- इंडियन सोजर्न– अंतर्गत मुंबई सीएसएमटी-वडोदरा, जोधपुर, जयपुर, उदयपूर, आग्रा, सवाई माधोपुर आणि दिल्ली
2- महाराष्ट्र स्प्लेंडर– मुंबई सीएसएमटी, नासिक, औरंगाबाद,पाचोरा,कोल्हापूर, मडगाव आणि सावंतवाडी
3- इंडियन ओडिसी–दिल्ली, सवाई माधोपुर, आग्रा, जयपुर, उदयपूर, वडोदरा, मुंबई सीएसएमटी
4- हेरिटेज ओडिसी–दिल्ली,आग्रा, सवाई माधोपुर, उदयपूर, जोधपुर, जैसलमेर, जयपुर आणि दिल्ली
5- कल्चर ओडीसी–दिल्ली, सवाई माधोपुर, आग्रा, जयपुर, ग्वाल्हेर, झाशी, खजुराहो, वाराणसी आणि दिल्ली
6- महाराष्ट्र वाइल्ड ट्रेल– मुंबई सीएसएमटी, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, वरोरा, पाचोरा, नासिक आणि मुंबई सीएसएमटी
7- दार्जिलिंग मेल– मुंबई सीएसएमटी, वडोदरा, उदयपूर, सवाई माधोपुर, जयपुर, आग्रा, बनारस आणि सिलिगुडी
8- दार्जिलिंग
मेल रिटर्न– सिलिगुडी, बनारस, आग्रा, सवाई माधोपूर, जयपुर, उदयपूर, वडोदरा आणि मुंबई सीएसएमटीकिती आहे या रेल्वेचा तिकीट दर?
23 सप्टेंबर पासून या रेल्वेचा नवा प्रवास सुरू झाला असून या रेल्वेचा दुसऱ्या पर्वातील पहिला उद्घाटनपर प्रवास पार पडला व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल असा परतीचा प्रवास या रेल्वेने केला. यामध्ये एमटीडीसीने एबिक्स सोबत केलेल्या भागीदारीच्या करारामुळे डेक्कन ओडिसीतुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कमाईमध्ये 1.64 कोटी रुपयांची भर पडणार आहे.
डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्या काही सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा मिळणार आहेत. यामध्ये स्पा, पार्लर तसेच जिम, विविध पदार्थांची रेलचेल असणारे रेस्टॉरंट या रेल्वेच्या माध्यमातून आकर्षणाचा विषय ठरणार आहे.
वर उल्लेख केलेल्या मार्गानुसार या रेल्वेचा प्रवास होणार असून या प्रवासाचे महाराष्ट्र स्प्लेंडर, महाराष्ट्र वाइल्ड ट्रेन तसेच इंडियन सोजर्न, इंडियन ओडिसी तसेच हेरिटेज ओडिसी आणि कल्चरल ओडिसी असे विभाग करण्यात आलेले आहेत. डेक्कन ओडिसीचे प्रवास भाड्याचा विचार केला तर सात दिवस आणि आठ रात्री असा प्रवास करण्यासाठी तुम्हाला सर्वसाधारणपणे 6 लाख 89 हजार 960.16 प्रति व्यक्ती इतके भाडे भरणे गरजेचे आहे.