Exclusive

Farming Business Idea : शेतीसोबत हे 2 व्यवसाय करा,कधीच नाही येणार पैशांची अडचण

 Farming Business Idea :- शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असल्यामुळे बऱ्याचदा अतिवृष्टी आणि गारपीट तसेच अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक वाया जाते आणि शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच शेतीमालाचे दर देखील घसरल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटते व शेतकरी कर्जबाजारी होतो. जर शेतकऱ्यांना या समस्येतून बाहेर निघायचे असेल तर शेती करत असताना शेती सोबत कुठले तरी शेतीवर आधारित किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय  करणे खूप गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आपण शेती करत असताना चांगले आर्थिक उत्पन्न देऊ शकणाऱ्या दोन व्यवसायांची माहिती घेणार आहोत.

 शेतीसोबत करा हे दोन व्यवसाय

1- गांडूळ खत उत्पादन गांडूळ खत उत्पादन आता काळाची गरज असून सेंद्रिय शेतीचे महत्व दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गांडूळ खताला या पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असणार आहे. गांडूळ खतालाच वर्मी कंपोस्ट असे देखील म्हटले जाते. या माध्यमातून गांडुळांचा वापर करून कंपोस्ट खत तयार करण्याची एक प्रक्रिया पार पडते. या प्रक्रियेमध्ये गांडूळ मातीमध्ये राहतात व बायोमास खातात आणि पचलेल्या स्वरूपात ते बाहेर टाकतात.

खत हा सेंद्रिय खताचा एक प्रकार असून या व्यवसायामध्ये गांडूळांच्या अनेक जातींचा वापर करून सेंद्रिय कचरा म्हणजेच कंपोस्ट तयार केले जाते. गांडूळ खत निर्मितीच्या या पद्धतीलाच आणि या माध्यमातून तयार झालेल्या खतालाच गांडूळ खत असे म्हणतात. गांडूळ खत हे जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच पिकांपासून उत्पादन वाढीसाठी

खूप महत्त्वाचे असून रोग आणि कीटकांच्या नियंत्रणासाठी देखील याची भूमिका महत्त्वाची आहे. सध्या संपूर्ण जगात गांडूळ खताची मागणी दिवसेंदिवस वाढत असून पिकांच्या भरगोस वाढीकरिता आवश्यक असणारे पोषक घटक आणि आवश्यक हार्मोन्स  या माध्यमातून मिळतात व त्यामुळे गांडूळ खत खूप आवश्यक आहे. फळबागा व फूलशेती आणि भाजीपाला शेतीमध्ये देखील उत्तम उत्पादन मिळवण्याकरता गांडूळ खत फायद्याचे आहे.

 गांडूळ खत व्यवसायात किती मिळू शकतो नफा?

जर आपण गांडूळ खत तयार करण्याचा खर्च पाहिला तर दोन रुपये प्रति किलो पेक्षा कमी आहे.जर आपण या खताचा विक्री दर पाहिला तर तो चार ते साडेचार रुपये किलो इतका आहे. यावरून तुम्हाला या व्यवसायातील नफ्याचे गणित समजू शकते.

2- मधमाशी पालन व्यवसाय जर सध्या मधाच्या उत्पादनात भारताचा विचार केला तर तो पाचव्या क्रमांकावर असून शेतकरी बंधूंचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी व मधमाशी पालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे याकरिता देशांमध्ये अनेक संस्था या व्यवसायाकडे सध्या लक्ष पुरवत आहे. त्यामुळे एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून जर या व्यवसायाचे संपूर्ण ट्रेनिंग घेतले तर हा व्यवसाय सुरू करणे शक्य होते व पैसा देखील चांगला मिळतो.

करत असताना मधमाशी पालन व्यवसाय हा खूप फायद्याचा व्यवसाय ठरतो. विशेष म्हणजे सरकारच्या माध्यमातून देखील या व्यवसायाकरिता आर्थिक मदत मिळू शकते. मधमाशी पालनामध्ये एका बॉक्समध्ये 50 किलो मधाचे उत्पादन मिळाले आणि शंभर रुपये प्रति किलो जरी विकले गेले तरी सुद्धा एका बॉक्सच्या माध्यमातून म्हणजेच एका मध्यपेटीच्या माध्यमातून पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

तुम्ही मोठ्या प्रमाणावर मधमाशी पालन व्यवसाय केला तर प्रत्येक महिन्याला एक लाख पंधरा हजार रुपयांपर्यंतचा नफा या माध्यमातून मिळू शकतो.दर्जेदार आणि चांगल्या मधाची किंमत बाजारात 250 रुपये प्रति किलो प्रमाणे देखील आहे. त्यामुळे मधमाशी पालन व्यवसाय देखील शेती करत असताना खूप फायद्याचा ठरू शकतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts