स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून काही रिक्त पदांच्या भरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याकरिता आता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 66 विविध प्रकारच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून आज पासून म्हणजेच 21 ऑगस्ट 2023 पासून यासाठीचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या लेखांमध्ये या भरतीची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.
रिक्त पदे आणि लागणारी शैक्षणिक पात्रता
1- उपअभिरक्षक, गट ब ( रिक्त पदे-01)- या पदाकरिता शैक्षणिक पात्रता पाहिली तर ती कला शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा किंवा प्राणीशास्त्र किंवा वनस्पती शास्त्र किंवा इतिहास किंवा प्राचीन संस्कृती अथवा मानव वंशशास्त्र किंवा वैधानिक विद्यापीठातील पुरातत्त्व शास्त्रातील पदवीत्तर पदवी याकरिता आवश्यक आहे. तसेच अनुभवाचा विचार केला तर एक वर्ष अनुभव याकरिता लागणार आहे.
2- सहाय्यक संचालक, गट ब( रिक्त पदे 1)- सहाय्यक संचालक, गट ब या पदाकरिता शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर वैधानिक विद्यापीठाच्या भारतीय इतिहासातील डॉक्टरेट/ इंडोलॉजी पुरातत्व शास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा इतिहासातील पदव्युत्तर पदवी अथवा पुरातत्त्वशास्त्रातील डिप्लोमा आवश्यक आहे. याकरिता तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे.
3- उपसंचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ( एकूण रिक्त पदे 34)- उपसंचालक या पदाकरिता किमान 50 टक्के गुणांचा सांख्यिकी किंवा बायोमेट्रिक किंवा इकॉनोमेट्रिक्स व गणितीय अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. अनुभवाचा विचार केला तर याकरिता तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे.
4- सहसंचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ( रिक्त पदे चार)- सहसंचालक या पदाकरिता लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेचािचार केला तर कमीत कमी 50 टक्के गुणांचं सांख्यिकी किंवा बायोमेट्रिक्स किंवा इकॉनॉमेट्रिक्स किंवा गणितीय अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. याकरिता पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
5- सहाय्यक प्रारूपकार–नि– अवर सचिव, गट अ ( रिक्त पदे तीन)- शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर (अ) कनिष्ठ ड्राफ्ट्समन तीन वर्षापेक्षा कमी कालावधी करिता किंवा (ब) तीन वर्षापेक्षा कमी नसलेल्या कालावधी करिता कायदा आणि न्याय विभागाच्या कायदेशीर बाजूने सरकारचे अवर सचिव किंवा समतुल्य पद धारण केलेले गरजेचे आहे.
6- वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट अ( रिक्त पदे दोन )- या पदाकरता रसायनशास्त्र किंवा जैव रसायनशास्त्र किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न आणि औषधे किंवा समतुल्य सह विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. लागणाऱ्या अनुभवाचा विचार केला तर कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त पाच वर्षाचा अनुभव याकरिता लागणार आहे.
7- सहयोगी प्राध्यापक( एकूण रिक्त जागा चार)– या पदाकरता लागणारे शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर पीएचडी, फार्मसी मधील पदवी किंवा प्रथम श्रेणी किंवा फार्मसी मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर समतुल्य असलेली पदवी तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे एससीआय जर्नल्स / यूजीसी/ ए आय सी टी इ मान्यताप्राप्त जर्नल्स मधील कमीत कमी एकूण सहा संशोधन प्रकाशने आवश्यक तसेच तिसरे महत्त्वाचे म्हणजे अध्यापन/ संशोधन/ उद्योगात किमान आठ वर्षाचा अनुभव किंवा ज्यापैकी जेव्हा दोन वर्षे पोस्ट पीएचडी अनुभव आवश्यक आहे.
8- प्राध्यापक( एकूण रिक्त पदे 12)- पीएचडी फार्मसी मधील पदवी किंवा प्रथम श्रेणी किंवा फार्मसी मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर समतुल्य आणि (अ) अध्यापन/ संशोधन/ उद्योगात कमीत कमी दहा वर्षाचा अनुभव किंवा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक. असोसिएट प्रोफेसर च्या समकक्ष पद (ii) एससीआय जर्नल्स/ यूजीसी/ एआयसीटीइ मान्यताप्राप्त जर्नल्स मध्ये सहयोगी प्राध्यापक स्तरावर कमीत कमी सहा संशोधन प्रकाशने आणि कमीत कमी दोन यशस्वी पीएचडी पदोन्नतीच्या पात्रतेच्या तारखेपर्यंत पर्यवेक्षक/ सहपर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केले आहे.(iii) पदोन्नतीच्या पात्रतेच्या तारखेपर्यंत एससीआय जर्नल्स / यूजीसी / एआयसीटीई मान्यताप्राप्त जर्नल्स मधील असोसिएट प्रोफेसरच्या स्तरावर कमीत कमी दहा संशोधन प्रकाशने असावेत.
9- तंत्रशिक्षण सहसंचालक/ संचालक( एकूण रिक्तपदे दोन)- यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीई/ बी टेक, पीएचडी आणि पंधरा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
10- सहाय्यक सचिव( तांत्रिक) एकूण रिक्त पदे दोन– लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रथम श्रेणी बीई किंवा बी टेक
लागणारी वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय हे एक डिसेंबर 2023 रोजी किमान 19 ते कमाल 54 वर्ष( मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ इत्यादीना वयात पाच वर्ष सुट)
लागणारे परीक्षा शुल्क
या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्गाला 719 रुपये तर मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक / अनाथ आणि दिव्यांगाकरिता 449 रुपये इतके आहे.
पदनिहाय मिळणारे वेतन
1- सहाय्यक प्रारूपकार नि– अवर सचिव, गट अ– मिळणारे वेतन 67 हजार 700 ते 2 लाख 7 हजार 700
2-वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सामान्य राज्यसेवा– मिळणारे वेतन 56 हजार 100 ते एक लाख 77 हजार 500
3- सहयोगी प्राध्यापक– एक लाख 31 हजार 400
4- प्राध्यापक– मिळणारे वेतन एक लाख 44 हजार दोनशे
5- तंत्र शिक्षण सहसंचालक/ संचालक– मिळणारे वेतन 78,800 ते दोन लाख नऊ हजार दोनशे
6- सहाय्यक सचिव( तांत्रिक)- मिळणारे वेतन ४९ हजार शंभर ते एक लाख 55 हजार 800
7- सहाय्यक संचालक, गट ब– ४१ हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे
8- उपअभिरक्षक, गट ब– 41 हजार आठशे ते एक लाख 32 हजार 300
9- सहसंचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ– 67 हजार 700 ते 2 लाख 8 हजार 700
10- उपसंचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ– 56 हजार 100 ते एक लाख 77 हजार 500
या भरती करता अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरती करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा 11 सप्टेंबर 2023 आहे.