Exclusive

ICC World Cup 2023 : उद्यापासून सुरु होतायेत World Cup, जाणून घ्या मोबाईल व टीव्हीवर एकदम फ्री मध्ये कुठे पाहू शकता सामने

ICC World Cup 2023  :- क्रिकेटप्रेमींसाठी उद्यापासून मोठी पर्वणी असणार आहे. कारण वनडे विश्व कप उद्या गुरुवार अर्थात 05 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. गत विश्वचषक विजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या उद्घाटनाचा सामना रंगणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा उदघाटनाचा सामना होईल. वर्ल्ड कपचा अंतिम सामना याच मैदानावर रंगणार आहे. याच मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. क्रिकेटप्रेमींसह सर्वच भारतीय नागरिकांना भारतीय संघाने विजेतेपद पटकावे अशी अशा आहे.

5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विश्वचषक स्पर्धेचे आयोजन

विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या विश्वचषकात 10 संघ सहभागी होणार आहेत. भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स आणि इंग्लंड या देशांचा समावेश आहे. या स्पर्धेत हे दहा संघ सहभागी होणार आहेत.

10 शहरांत होतील विश्वचषकाचे सामने

भारतातील 10 शहरांमध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या शहरांत या स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन फॉर्मेट मध्ये होणार आहेत. दहापैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. गेल्या वेळी इंग्लंडने विश्वचषक जिंकलं होता. न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव झाला होता.

कोणकोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहता येईल विश्वचषकातील सामने

विश्वचषकातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर चाहत्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेता येणार आहे. डीडी फ्री डिशचा वापर करणारे प्रेक्षक डीडी स्पोर्ट्सवर भारताचे सामने आणि सेमीफायनल आणि फायनल मॅच मोफत पाहू शकतात.

ICC World Cup 2023 लाइव स्ट्रीमिंग

तुम्ही Disney + Hotstar ऍपवर विश्वचषक सामने ऑनलाइन पाहू शकता. तुम्हाला मोबाईलवर सामना मोफत पाहता येणार आहे. लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहण्यासाठी तुम्हाला पैसे पेड करून सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.

असे असतील भारताचे सामने

  • 8 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
  • 11 ऑक्टोबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
  • 14 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
  • 19 ऑक्टोबर : भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
  • 22 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
  • 29 ऑक्टोबर: भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
  • 2 नोव्हेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई
  • 5 नोव्हेंबर: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
  • 12 नोव्हेंबर: भारत विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू.
  • भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होतील.

आयसीसी वनडे विश्व कप मधील सहभागी टीम –

1. भारत
2. पाकिस्तान
3. श्रीलंका
4. बांग्लादेश
5. अफगानिस्तान
6. दक्षिण अफ़्रीका
7. ऑस्ट्रेलिया
8. न्यूजीलँड
9. इंग्लंड
10. नेदरलँड

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts