Indian Railways Amazing Facts: इंडियन रेल्वे म्हणजेच भारतीय रेल्वे ही वाहतुकीच्या दृष्टिकोनातून भारताचे जीवन वाहिनी समजली जाते. संपूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क भारतीय रेल्वे आहे. दररोजचा विचार केला तर अडीच कोटी लोक रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात व 30 लाख टनांपेक्षा जास्त मालाची वाहतूक देखील केली जाते. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमे पर्यंत अगदी कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेचे जाळे विकसित करण्यात आलेले आहे.
अजून देखील ज्या ठिकाणी रेल्वे नाही त्या ठिकाणी रेल्वेचे जाळे विकसित केले जात आहेत. तसेच भारतातील रेल्वे स्टेशनचा विचार केला तर अनेक रेल्वे स्टेशनची वेगवेगळी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्यांची वेगळीच ओळख भारतामध्ये आहे. याच वेगळेपणाच्या अनुषंगाने आपण एका रेल्वे स्टेशनचा विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक असतो.
साधारणपणे ही दोन्ही कागदपत्रे आपल्याला विमानतळावर लागतात. यातील व्हिसा हा विदेश प्रवासाकरिता आवश्यक असतो. परंतु रेल्वे स्टेशनवर पासपोर्ट आणि व्हिसाची आवश्यकता का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. याच अनुषंगाने आपण या रेल्वे स्टेशन विषयी महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
अटारी रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी लागतो व्हिसा आणि पासपोर्ट
भारतातील अटारी रेल्वे स्टेशन हे पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात असून उत्तर रेल्वे विभागाच्या फिरोजपुर रेल्वेच्या अखत्यारित येते. अटारी रेल्वे स्टेशन हे भारताचाच भाग आहे परंतु या रेल्वे स्टेशन
वर तुम्हाला जायचे असेल तर तुम्हाला पाकिस्तानची परवानगी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही या ठिकाणी जाण्याकरिता पासपोर्ट आणि व्हिसा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकतो किंवा दंड देखील भरावा लागू शकतो.या ठिकाणी बळजबरीने घुसणे देखील गुन्हा आहे. या ठिकाणी थांबणाऱ्या किंवा या ठिकाणाहून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ट्रेनचा विचार केला तर फक्त समझोता एक्सप्रेस या ठिकाणाहून जात होती. समजोता एक्सप्रेस ने प्रवास करण्याकरिता देखील येथे तिकीट खरेदी करताना पासपोर्ट क्रमांक देणे गरजेचे होते. परंतु आता हे रेल्वे स्टेशन फक्त या एक्सप्रेस साठी खुले करण्यात आले आहे. या ठिकाणाहून दिल्ली ते आटारी एक्सप्रेस, अमृतसर ते अटारी डेमू जबलपूर ते अटारी स्पेशल ट्रेन या ठिकाणी तुम्हाला या रेल्वे स्टेशनवर दिसून येतात परंतु यापैकी एकही ट्रेन अटारी ते लाहोर या मार्गावरून जात नाही.