Exclusive

IRCTC Tour Package: आयआरसीटीसीने आणले श्रीलंका दौऱ्यासाठी खास टूर पॅकेज! राम व सीतेशी संबंधित ठिकाणांना भेट देण्याची सुवर्णसंधी

IRCTC Tour Package:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्याची मोठ्या प्रमाणावर आवड असते. असे व्यक्ती हे देशांतर्गत असलेल्या पर्यटन स्थळांनाच नव्हे तर अनेक विदेशातील पर्यटन स्थळांना देखील भेट देत असतात

अशा हौशी पर्यटकांसाठी अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून देखील आकर्षक असे टूर पॅकेज उपलब्ध करून दिले जातात. तसेच आयआरसीटीसीच्या माध्यमातून देखील देशात आणि विदेशात पर्यटन घडवण्यासाठी आकर्षक असे पॅकेज पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिले जातात.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण आयआरसीटीसीचा विचार केला तर यामाध्यमातून आता पर्यटकांसाठी उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथून श्रीलंकेपर्यंत एक हवाई टूर पॅकेज सुरू करण्यात आलेले असून या पॅकेजला ‘द रामायण सागा’ टूर पॅकेज असे नाव देण्यात आलेले आहे. या पॅकेज अंतर्गत श्रीलंकेमधील रामायणाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणे पर्यटकांना पाहण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.

 आयआरसीटीसीने श्रीलंके दौऱ्यासाठी आणले खास टूर पॅकेज

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, पर्यटकांना रामायणाशी संबंधित असलेले जे ठिकाणी आहे त्यांना भेट देता यावी याकरिता उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथून श्रीलंकेपर्यंत हवाई टूर पॅकेज सुरू केले असून या पॅकेजला द रामायण सागा टूर पॅकेज असे नाव देण्यात आलेला आहे.

या पॅकेज अंतर्गत लखनऊ ते श्रीलंका हे सात दिवस आणि सहा रात्रीचे टूर पॅकेज लॉन्च करण्यात आलेले असून 9 मार्च 2024 ते 15 मार्च 2019 पर्यंत हे पॅकेज असणार आहे. या अंतर्गत पर्यटकांना कोलंबोमधील मुनेश्वरम मंदिर, कॅंडी मधील मनावरी राम मंदिर आणि स्पाइस गार्डन,

रामबोडा वॉटर फॉल, टी गार्डन तसेच न्यूआरा इंडिया मधील सिताअम्मा मंदिर, अशोक वाटिका तसेच दिवारूम्पोला मंदिर( सीता अग्नी चाचणी स्थळ) इत्यादी पर्यटन स्थळे पाहता येणार आहेत.

 या टूर पॅकेजचे स्वरूप कसे असणार आहे?

 टूर पॅकेज अंतर्गत लखनऊ ते कोलंबो आणि लखनऊ परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आलेली असून हे हवाई टूर पॅकेज असून यामध्ये राऊंड ट्रीप हवाई प्रवास, थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था तसेच भारतीय जेवणाची व्यवस्था व यामध्ये नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवणाची सोय देखील आयआरसीटीसीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

 किती लागणार आहे भाडे?

 या टूर पॅकेजमध्ये सोबत राहणाऱ्या तीन व्यक्तींसाठी पॅकेजेची किंमत 71 हजार रुपये प्रतिव्यक्ती निश्चित करण्यात आलेली असून दोन व्यक्ती जर एकत्र राहतील तर पॅकेजची किंमत 72 हजार दोनशे रुपये प्रति व्यक्ती इतकी आहे.

एका व्यक्ती करिता पॅकेजची किंमत 88 हजार आठशे रुपये प्रति व्यक्ती आहे. तसेच आई-वडिलांसोबत जर राहणारी मुले असतील तर त्यांना प्रत्येक मुलासाठी पॅकेजेची किंमत 57 हजार 300 रुपये( बेडसह) आणि चोपन्न हजार आठशे रुपये( बेडशिवाय) प्रति व्यक्ती इतकी असणार आहे.

 बुकिंग कसे करावे?

 या टूर पॅकेजेचे बुकिंग करण्यासाठी पहिल्यांदा बुकिंग करणाऱ्याला प्राधान्य या तत्त्वावर केले जाणार असून या बुकिंग करिता पर्यटन भवन, गोमती नगर तसेच लखनऊ आणि कानपूर येथे असलेले जे काही आयआरसीटीसीचे कार्यालय आहे या ठिकाणी देखील बुकिंग करता येणार आहे किंवा आयआरसीटीसीची वेबसाईट www.irctctourism.com वरून देखील ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करता येणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts