Isro Job : इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय. जर आपल्या भारताच्या या अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचा केला तर जगातील ज्या काही आघाडीच्या अंतराळ संस्था आहेत त्यापैकी इस्रो एक आहे. नुकताच 23 ऑगस्ट रोजी इस्रोने चंद्रयान तीनचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करून जगात विश्वविक्रम प्रस्थापित केला व भारत दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग करणारा पहिला देश ठरला.
अनेक प्रकारच्या मोहिमा यशस्वीपणे राबवण्यामध्ये इस्रोचा हातखंडा आहे. इस्रोच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अंतराळ मोहिमा राबवल्या जातात व आता येणाऱ्या काळामध्ये देखील राबवल्या जाणार आहेत. परंतु या अंतराळ मोहिमा यशस्वी करण्यासाठी एक मोठी शास्त्रज्ञांची टीम आवश्यक असते. त्यामुळे तरुण आणि तरुणींना भारतातील या अंतराळ संशोधन संस्थेमध्ये करिअर निवडण्यासाठी नक्कीच मोठी संधी असून या माध्यमातून देशासाठी काही करण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते.
जर तुम्हाला देखील भारताच्या या अंतराळ कार्यक्रमाचा भाग व्हायची इच्छा असेल तर तुम्हाला इस्रोमध्ये अवकाश शास्त्रज्ञ होणे गरजेचे आहे. परंतु याकरिता तुम्हाला काय करावे लागेल? हे देखील माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे या अनुषंगाने आपण या लेखात इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याकरिता काय करावे लागते? याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊ
इस्रोमध्ये अंतराळ शास्त्रज्ञ होण्यासाठी काय करावे लागेल?
इस्रोमध्ये अंतराळ शास्त्रज्ञ व्हायचे असेल तर तुम्हाला अभियांत्रिकी किंवा विज्ञान अभ्यासक्रम निवडणे गरजेचे आहे. यामध्ये यांत्रिक, इलेक्ट्रिकल किंवा संगणक अभियांत्रिकी किंवा खगोलशास्त्र, भौतिक शास्त्र किंवा गणितात पीएचडी असलेल्या उमेदवारांची भरती करण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर काम चालते.
उदाहरणच घ्यायचे झाले तर भौतिक शास्त्रज्ञ फील्ड आणि प्रयोगशाळेच्या उपकरणांच्या सिद्धांतिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतात. अंतराळामध्ये काही गोष्टी कशा कार्य करतात यासाठी भौतिक शास्त्रज्ञ जबाबदार असतात तर खगोलशास्त्रज्ञ तारे, ग्रह तसेच आकाशगंगा इत्यादींचा अभ्यास करतात. म्हणून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ व्हायचे असेल तर विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेतील संबंधित शिक्षण घेणे गरजेचे आहे. इस्रो मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स यासारख्या विषयांमध्ये इंजीनियरिंग सह खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणितात पीएचडी असलेल्या उमेदवारांची भरती करते.
त्यामुळे उमेदवारांनी वर उल्लेख केलेल्या विषयांमध्ये किंवा अंतराळ व तंत्रज्ञान आणि भौतिकशास्त्राशी संबंधित बॅचलर पदवी घेणे गरजेचे आहे. याकरिता योग्य प्रकारचे शिक्षण घेणे गरजेचे असून प्रत्यक्षपणे किंवा सीआरपी परीक्षेच्या माध्यमातून खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या क्षेत्राशी संबंधित योग्य ज्ञान आणि आवश्यक कौशल्य असलेल्या उमेदवारांची इस्रोद्वारे भरती केली जाते.
यासाठीच्या आवश्यक पायऱ्या
1- पायरी एक– याकरिता सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक स्तरावरील म्हणजेच बारावीला गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय घेऊन उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. तसेच गणितातील तसेच भौतिक संकल्पनांचे उत्कृष्ट आणि चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे.
2- पायरी दोन– माध्यमिक स्तरावरील परीक्षा चांगल्या टक्केवारीने (75% पेक्षा जास्त) पास केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जी ऍडव्हान्स आणि जी मेन्स या माध्यमातून उपलब्ध असलेल्या अभियांत्रिकी शाखांपैकी एका शाखेत प्रवेश घेतला पाहिजे. यामध्ये यांत्रिक अभियांत्रिकी, एरोस्पेस अभियांत्रिकी, संगणक विज्ञान अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, अभियांत्रिकी भौतिकशास्त्र, रेडिओ अभियांत्रिकी आणि इतर संबंधित क्षेत्रातील अभ्यासक्रमांमध्ये बी टेक किंवा बीई करणे आवश्यक आहे.
3- पायरी 3- बी टेक किंवा बीई पूर्ण केल्यानंतर तिसरी पायरी म्हणजे आय सी आर बी परीक्षा देणे ही होय. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल किंवा इतर कोणत्याही संबंधित क्षेत्रातील बीटेक किंवा बीई पदवी दहाच्या स्केलवर किमान एकूण 65% गुणांसह किंवा 6.8 सीजीपीए असणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवारांना इसरो मध्ये यशस्वीरित्या सहभागी होण्याकरिता लेखी चाचणी आणि मुलाखत फेरीसाठी उपस्थित राहावे लागते.
4- पायरी चौथी– संबंधित स्पेशीलायझेशन नंतर पदव्युत्तर म्हणजेच एमएससी, एमई किंवा एम टेक आणि पीएचडी पूर्ण केलेल्यांसाठी इस्रोमध्ये शास्त्रज्ञ कसे व्हावे यासाठी देखील एक मार्ग आहे. यामध्ये पदवी पूर्ण झाल्यावर काही टॉप एम टेक च्या अभ्यासक्रमांमध्ये भूभौतिकी, भूगर्भशास्त्र, इन्स्ट्रुमेंटेशन, उपयोजित गणित इत्यादींचा समावेश होतो. इस्रोमध्ये अर्ज करण्याकरिता निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असतो. हे टप्पे पार केल्यानंतर इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळवता येते.
इस्रो मध्ये ज्युनियर रिसर्च फेलोसाठी अर्ज करण्याकरिता
इस्रो मध्ये ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून एखाद्या पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. यामुळे शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून संशोधन करता येते. साहजिकच अशा संस्थेमध्ये शास्त्रज्ञांची निवड करण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण असते व याकरिता उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व इतर बाबी आवश्यक असतात.