King Cobra Snake:- जागतिक पातळीवर विचार केला तर सापांच्या अनेक प्रकारच्या जाती असून यामध्ये काही जाती विषारी आहेत तर बहुसंख्य जाती या बिनविषारी आहेत. तसेच भारतामध्ये देखील सापांच्या विविध प्रकारच्या जाती असून यामध्ये चार ते सहा जाती या अतिविषारी आहेत.
यामध्ये प्रामुख्याने किंग कोब्रा,घोणस, फुरसे आणि मन्यार या जाती अतिविषारी वर्गामध्ये येतात. यातील जर आपण किंग कोब्रा या सापाचा विचार केला तर हा खूपच धोकादायक आणि सर्वात विषारी सापांपैकी एक असून जर या सापाने चावा घेतला तर या सापाच्या विषाचा थेट परिणाम शरीरामधील मज्जातंतूवर होतो व माणसाचा अर्ध्या तासाच्या आत मृत्यू होऊ शकतो.
या अनुषंगाने या लेखात आपण या किंग कोब्रा जातीच्या सापाबद्दल महत्वाच्या काही फॅक्ट पाहणार आहोत ज्या तुम्हाला माहिती नसतील.
किंग कोब्रा सापाबद्दल माहिती नसलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी
जर आपण किंग कोब्रा सापाचा विचार केला तर त्याचे खाद्य म्हणजे तो इतर प्राणीच खातो असे नाही तर इतर लहान किंग कोब्रा साप देखील खातो. विशेष म्हणजे किंग कोब्राचे आवडते खाद्य हे साप आहे. जर त्याला आजूबाजूला खाण्यासाठी साप दिसले नाही तर तो सरडे व इतर लहान सस्तन प्राणी देखील खातो.
किंग कोब्रा सापाच्या मादीचा विचार केला तर ती अंडी घालते व याकरिता ती घरटे बांधते व अंड्याचे संरक्षण करते. मादी किंग कोब्राही अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी घरटे बांधते.ती घरटे बांधण्याकरिता डहाळ्या आणि झाडाच्या पानांचा वापर करते. विशेष म्हणजे या घरट्यातून मादी जेव्हा अन्नाच्या शोधासाठी बाहेर येते तेव्हा अंड्यांचे किंवा घरट्याचे संरक्षण नर कोब्रा करत असतो.
किंग कोब्रा इतर सापापेक्षा जास्त काळ जिवंत राहतो
जर आपण याचा जीवनमान कालावधी पाहिला तर तो इतर आपण पेक्षा जास्त काळ जिवंत राहतो. किंग कोब्रा जातीच्या सापाचे वय सुमारे वीस वर्षे असते. किंग कोब्राची वैशिष्ट्य म्हणजे इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या तुलनेत जर पाहिले तर त्याच्यावर अन्नाची कमतरता किंवा दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींचा जास्त परिणाम होत नाही व त्याचे नुकसान देखील कमी होते. किंग कोब्रा हा बराच काळ अन्नाविना जिवंत राहू शकतो व त्याला जास्त प्रमाणात पाण्याची देखील आवश्यकता भासत नाही.
किंग कोब्रा आहे जगातील सर्वात वेगवान साप
किंग कोब्रा जगातील सर्वात वेगवान सांपापैकी एक असून त्याचा धावण्याचा वेग 3.33 मीटर प्रतिसेकंद इतका आहे. विशेष म्हणजे किंग कोब्रा माणसांचा पाठलाग कधीच करत नाही. परंतु जर त्याच्या जीवाला कधी धोका असल्याचे त्याला जाणवले तर तो व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.
तसेच इतर सापांच्या तुलनेत अधिक चपळ असतो. हा साप उंची आणि त्याच्या मार्गाच्या दरम्यान वेगाने फिरू शकतो व झाडांवर लवकर चढतो आणि पाण्यात देखील बुडू शकतो. एखाद्या उंचीवर चढण्यासाठी तो माणसांना देखील मागे पाडतो. परंतु जगाचा तुलनेत विचार केला तर किंग कोब्रापेक्षा सापांच्या काही जाती त्यापेक्षा जास्त वेगवान आहेत.
उदाहरणच घ्यायचे झाले तर साईड वाईंडर हा साप 18 मीटर प्रति सेकंद, ब्लॅक मांबा हा आठ मीटर प्रति सेकंद आणि सदर्न ब्लॅक रेसर सात मीटर प्रति सेकंद वेगाने धावतो. विशेष म्हणजे किंग कोब्राला सगळ्यात जास्त धोका हा मुंगूस पासून आहे. कारण या सापाचे सर्वात जास्त शिकार मुंगूस करतात.