Maharashtra Monsoon News : जून महिना सुरू झाला आहे. आता शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेला आस लागली आहे ती मान्सूनची. अशातच मान्सून संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आमच्या हाती आली आहे. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी राज्यात मान्सून काळात कसा पाऊस होणार या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉक्टर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात सरासरी 95 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये जून, जुलै महिन्यात कमी पावसाची शक्यता आहे. तसेच ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात साधारण पाऊस पडेल असा त्यांनी अंदाज वर्तवला आहे. यंदा विदर्भात मात्र शंभर टक्के पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग : मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक जाहीर ! मध्य रेल्वेने काढले महत्त्वाचे परिपत्रक, वाचा…
यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी ही एक निश्चितच आनंदाची बातमी राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, डॉक्टर साबळे गेल्या वीस वर्षांपासून हवामानाचा अंदाज देत आहेत. दरम्यान त्यांनी यंदा राज्यात कमी पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.
ते सांगतात की, यंदा जून, जुलै या दोन महिन्यात खानदेश मधील धुळे, जळगाव या दोन जिल्ह्यात तसेच राहुरी, कराड, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही (चंद्रपूर) या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडण्याची भीती आहे.
मात्र दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर व परभणी या भागात पावसाच्या खंडाचा कालावधी हा कमी राहणार आहे. मात्र या भागात देखील पावसाचा खंड राहणारच आहे.
हे पण वाचा :- द्राक्षे बागायतदारांची चिंता वाढवणारी बातमी; बेदाण्याच्या दरात झाली मोठी घसरण ! मिळतोय मात्र ‘इतका’ दर, कारण काय?
मान्सूनच आगमन केव्हा होणार?
याबाबत डॉक्टर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर जर तीन ते चार दिवस सतत पाऊस पडला तर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत असते. तसेच सध्याच्या परिस्थितीनुसार महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 10 जूनच्या सुमारास होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
एकंदरीत भारतीय हवामान विभागाप्रमाणेच साबळे यांनी देखील मान्सूनचे राज्यात 10 जूनला आगमन होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. यंदा मात्र राज्यात कमी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी ही एक चिंतेची बाब ठरू शकते.
हे पण वाचा :- खरीपात तुरीच्या ‘या’ वाणाची पेरणी करा; 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार !