Maratha Reservation :- अंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जनसमुदाय एकत्र जमलेला होता. यात मनोज जरांगे यांनी 10 दिवसांची मुदत सरकारला दिली आहे.
या सभेनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यात आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वपूर्ण स्टेटमेंट केले आहे. ते अकोल्यात बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ओबीसीमधून आरक्षण मागणे ही जरांगे यांची चुकीची मागणी असल्याचे विखे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ही खर तर मागणी आहे. आमचा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध आहे असं काहींना वाटेल पण तस नाही.
पण त्यांनी ओबीसी मधून आरक्षण मागणं योग्य नाही, अस आमचं म्हणणं आहे. निजाम काळातील कुणबी दाखले मिळाले तर घिकच आहे. पण कुणाच्या आरक्षणात वाटेकरी होणं योग्य नाही असे असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीवर देखील टीका केली आहे. फडणीस यांनी दिलेलं आरक्षण टिकलं होतं परंतु महाविकास आघाडीला ते कोर्टात टिकवता आलं नाही असं विखे यांनी म्हटलं आहे.
कायद्याच्या चौकटीत आरक्षण देऊ
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आरक्षण दिल पाहिजे. हा मुद्दा भावनिक करून उपयोग नाही. दुसऱ्या समाजावरही अन्याय नको. टिकणार आरक्षण मिळालं तर मनोज जरांगे सारख्या अनेक लढवय्यांना खरा न्याय मिळेल.