Exclusive

पुण्यात स्वतःचे घर घेण्याची सुवर्णसंधी! म्हाडा काढणार 5 हजार घरांसाठी सोडत, वाचा महत्त्वाच्या तारखा

मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु अशा शहरांमध्ये घर घेणे हे पाहिजे तेवढे सोपे नाही. कारण या शहरांचा झालेला झपाट्याने विकास आणि त्या दृष्टिकोनातून वाढलेल्या जागेच्या आणि घराच्या किमती पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरची बाब आहे. परंतु आपण म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थांचा विचार केला तर यांच्या माध्यमातून उत्तम दर्जांचे घरे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतात.

याच अनुषंगाने म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला व त्यानंतर आता पुणे, औरंगाबाद आणि कोकण मंडळातील घरांसाठी देखील सोडत काढण्यात येणार आहे. आता जर कुणाला औरंगाबाद आणि पुण्यामध्ये घर घ्यायची इच्छा असेल ते म्हाडाच्या या सोडतीमध्ये नशीब आजमावू शकतात.

 पुण्यात म्हाडाच्या 5000 घरांची आक्टोबर मध्ये निघणार सोडत

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या पुणे मंडळाच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून पुणे मंडळाने पुण्यामध्ये पाच हजार घरांची सोडत काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यासंबंधीचे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर ताबडतोब अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

साधारणपणे ही सोडत ऑक्टोबर महिन्यामध्ये काढण्यात येणार असून ही पुण्यातील म्हाडाच्या माध्यमातून काढण्यात येणारी दुसरी सोडत असणार आहे. म्हाडाच्या कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळातील घरांसाठी सोडत काढण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांनी जाहीर केलेले होते. त्यानुसार पुणे मंडळातील 5000 घरांसाठी ऑक्टोबर मध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती  पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी दिली आहे.

 कधी प्रसिद्ध होणार जाहिरात?

पुणे मंडळाच्या 5000 घरांसाठी जी काही सोडत काढण्यात येणार आहेत त्यासाठीची जाहिरातीची तयारी पूर्ण करण्यात आली असून 25 ऑगस्ट रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. 25 ऑगस्ट ला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे व त्या दिवसापासूनच यासंबंधीचे अर्ज विक्री व स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे. पुणे मंडळाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा यामध्ये समावेश असून पुण्यासोबतच सोलापूर तसेच सांगली आणि कोल्हापूर येथे देखील घरांसाठी सोडत करण्यात येणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts