Exclusive

Mini Tractor : शेतीमध्ये अवतरत आहे मिनी ट्रॅक्टरचे युग! मिनी ट्रॅक्टर का आहे शेतकऱ्यांची पसंद? वाचा वैशिष्ट्य

Mini Tractor :- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आणि झपाट्याने बदल होत असून त्या अनुषंगाने शेतीमध्ये करायचे कामे आणि यंत्रे यामध्ये देखील बदल केले जात आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर होय. या अगोदर जर आपण पाहिले तर काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर मोठे ट्रॅक्टर  विकले जायचे.

परंतु आता त्याची जागा मिनी ट्रॅक्टर झपाट्याने काबीज करत असून या छोट्या ट्रॅक्टरचा मेंटेनन्स देखील खूप कमी असल्यामुळे आणि किंमत देखील स्वस्त असल्यामुळे शेती व्यतिरिक्त इतर कामांमध्ये मोठ्या ट्रॅक्टर सारखेच छोटे ट्रॅक्टर देखील उपयुक्त आहेत. त्यामुळे आता मोठ्या ट्रॅक्टर पेक्षा छोट्या ट्रॅक्टरची मागणी वाढू लागली आहे.

 या कंपन्यांचे मिनी ट्रॅक्टर आहेत प्रसिद्ध

अलीकडच्या काळात विचार केला तर महिंद्रा ने जागतिक स्तरावर अतिशय स्मार्ट तंत्रज्ञान वापरून कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरची मालिका सुरू केली असून महिंद्राचे सर्वात लहान ट्रॅक्टरमध्ये 3 सिलेंडर व 21 एचपीचे इंजिन आहे. या मिनी ट्रॅक्टरचा आकार खूप लहान आहे तरी देखील ते चार व्हील ड्राईव्ह सारख्या प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असे आहे. महिंद्रा व्यतिरिक्त मार्केटमध्ये सोनालिका, मॅसी फरगुशन, जॉन डियर, स्वराज आणि न्यू हॉलंड यासारख्या टॉप ट्रॅक्टर कंपन्यांची मिनी ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आलेले आहेत. जर आपण या कंपन्यांच्या मिनी सेगमेंटचा विचार केला तर 18 ते 28 एचपी इंजिन असलेले ट्रॅक्टर यामध्ये असून त्यांची किंमत अडीच ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

 मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा मिनी ट्रॅक्टरला का आहे शेतकऱ्यांची पसंती?

1- फळबागांमध्ये मिनी ट्रॅक्टरचा होतो चांगला उपयोग आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी फळबागा व भाजीपाला यासारखे नगदी पिके घेतात. अशा फळ बागेमध्ये किंवा भाजीपाला उत्पादित केल्या जाणाऱ्या शेतामध्ये बऱ्याचदा मोठ्या ट्रॅक्टर ऐवजी मिनी ट्रॅक्टर चांगले काम करतात. सफरचंद तसेच केळी, द्राक्षे, डाळिंब व इतर फळबागांमध्ये मिनी ट्रॅक्टरचा वापर आता वाढत आहे. अनेक प्रकारच्या आंतरमशागतींच्या कामासाठी फळबागांमध्ये मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा मिनी ट्रॅक्टर सोयीस्कर ठरते.

2- व्यावसायिक कामासाठी देखील उत्तम* मिनी ट्रॅक्टर हे आकाराने लहान असले तरी त्यांच्या इंजिन मध्ये खूप क्षमता असते. या ट्रॅक्टरमध्ये चार व्हील सारखे प्रगत वैशिष्ट्ये देखील असतात व त्यामुळेच ते मोठ्या ट्रॅक्टरच्या सोबत काम करू शकतात. शेती व्यतिरिक्त हे कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर व्यवसायिक कामासाठी देखील उपयुक्त आहेत.

माल वाहून नेणे एवढेच नाही तर इतर कामे देखील ते सहजपणे करतात. बांधकाम क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मिनी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. तसेच व्यावसायिक  कामानिमित्त दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी मोठा ट्रॅक्टर पोहोचणे कठीण असते अशा ठिकाणी मिनी ट्रॅक्टर अगदी आरामात जाऊ शकते. त्यामुळे देखील मिनी ट्रॅक्टर चे मागणी वाढत आहे.

3- मिनी ट्रॅक्टरची कॅपॅसिटी लहान ट्रॅक्टर अधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची परवडणारी क्षमता ही होय. बरेच मिनी ट्रॅक्टर चार लाख रुपयापेक्षा कमी किमतींमध्ये देखील तुम्ही खरेदी करू शकतात. जर आपण या तुलनेत मोठ्या ट्रॅक्टरचा विचार केला तर चांगल्या ब्रँडच्या ट्रॅक्टरची किंमत सात ते आठ लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच मिनी ट्रॅक्टर हे इंधन कार्यक्षम असून कमी जागेत देखील पार्क करणे शक्य असते. ज्या ठिकाणी मोठे ट्रॅक्टर पोहोचणे शक्य नसते अशा ठिकाणी शेती किंवा व्यावसायिक कामांकरिता मिनी ट्रॅक्टर पोहोचतात.

इत्यादी कारणांमुळे आता शेतकऱ्यांमध्ये मोठ्या ट्रॅक्टरऐवजी मिनी ट्रॅक्टरची क्रेझ वाढत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts